[ads1]
![]()
चोरट्यांच्या नवीन क्लृप्तीचा बळी रविवारी मध्यरात्री पावणेदोन वाजेच्या सुमारास एन-७ मधील एका रुग्णालयासमोर पवन वैष्णव हा तरुण ठरला. टूर अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिक असलेले पवन वैष्णव (३२, रा. पदमपुरा) आणि त्यांचे मित्र सतीश क्षीरसागर हे दोघे रात्री पावणे दोन वाजेच्या सुमारास एन-७ परिसरातून पायी जात होते. त्या वेळी समोरून आलेल्या तीन अज्ञात चोरट्यानी त्यांना अडवले आणि माचिस मागितली. पवन यांनी खिशातील माचिस काढून दिली असता, “तुम्हाला लायटर ठेवता येत नाही का?” असे म्हणत तिघांनी थेट शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. त्यातील एकाने खिशातील तीक्ष्ण चाकू काढून पवन यांच्या गळ्याला लावला आणि त्यांचा मोबाइल हिसकावून घेतला. या अचानक झालेल्या हल्ल्याने दोन्ही मित्र हादरले. सतीश यांनी मध्यस्थी करत आरोपींची समजूत काढल्याने चोरट्यांनी मोबाइल परत फेकला आणि निघून जाण्यास सांगितले. मात्र, थोडे पुढे गेल्यानंतर पवन यांच्या लक्षात आले की, या झटापटीच्या बहाण्याने चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १० ग्रॅमची (१ तोळा) सोन्याची साखळी अत्यंत सफाईदारपणे उडवली होती. इनसाइड स्टोरी: सिडको ठाण्याच्या हद्दीत बिअर बारला अभय सिडको ठाण्याच्या हद्दीत बार उशिरापर्यंत सुरू असल्याने मद्यधुंद टवाळखोर रस्त्यावर येऊन उघड्यावर फिरतात आणि रात्री जाणाऱ्या-येणाऱ्यांना सावज बनवतात. अवैध बारचालकांवर ठोस कारवाई करण्याऐवजी पोलिस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. मध्यरात्री पावणेदोन वाजता शहराच्या मुख्य भागात चाकू घेऊन गुंड फिरतात. संभाजीनगर: मुलाच्या स्कूल बसची वाट पाहणाऱ्या मातेचे दीड तोळ्याचे गंठण लांबवले उस्मानपुरा हद्दीतील ज्योतीनगर भागात मुलाची स्कूल बसची वाट पाहत उभ्या असलेल्या एका ३७ वर्षांच्या विवाहितेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे (१४.३५ ग्रॅम) सोन्याचे गंठण २ चोरट्यांनी ओरबाडून नेले. या घटनेत फिर्यादी पूजा स्वप्निल खंडेलवाल (३७, रा. न्यू एसबीएच कॉलनी, ज्योतीनगर) यांच्या डाव्या बाजूला गळ्याला जखम झाली. पूजा खंडेलवाल या गुरुवारी दुपारी १:२० वाजेच्या सुमारास न्यू एसबीएच कॉलनीतील पाण्याच्या टाकीजवळ मुलाची वाट पाहत उभ्या होत्या. त्या वेळी पाठीमागून एका दुचाकीवरून २ तरुण आले. दुचाकी चालवणाऱ्याने तोंडाला मास्क लावला होता, तर पाठीमागे बसलेल्याने अंगात क्रीम रंगाची हुडी घालून डोके झाकले होते, जेणेकरून त्यांची ओळख पटू नये. चोरट्यांनी गाडी पूजा यांच्या अगदी जवळ आणून गळ्यातील गंठण अत्यंत जोराने हिसकावले. हिसका इतका भीषण होता की, सोन्याची साखळी तुटण्यासोबतच पूजा यांच्या गळ्याची त्वचा चिरली गेली. पूजा यांनी क्षणाचाही विलंब न करता आरडाओरड केली, मात्र अवघ्या काही सेकंदांत दोन्ही चोरटे पसार झाले. या प्रकरणी उस्मानपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
[ads2]
माचिस मागितली, मारहाण करून सोनसाखळी लंपास:सिडकोत मध्यरात्री गुंडांचा धुमाकूळ, पोलिसांचे दुर्लक्ष
















Leave a Reply