A bribe of ₹15,000 for forwarding the agricultural land survey report to the cou…


A bribe of ₹15,000 for forwarding the agricultural land survey report to the court | शेतजमिनीचा मोजणी अहवाल न्यायालयात पाठवण्यासाठी १५ हजारांची लाच; भूमी अभिलेखचा शिपाई जाळ्यात!

नांदेड : शेतजमिनीचा मोजणी अहवाल न्यायालयात पाठविण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना भूमी अभिलेख कार्यालय, मुखेड येथील शिपाई विवेकानंद पांडुरंग खुडे (वय ३५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (२ सप्टेंबर) रंगेहात पकडले.
तक्रारदाराच्या पत्नीच्या नावावरील मुखेड येथील गट क्रमांक ६१ मधील ५३ आर शेतजमिनीची मोजणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल न्यायालयात पाठविण्यासाठी खुडे यांनी १५ हजार रुपयांची मागणी केली. पडताळणीदरम्यान खुडे यांनी निमतानदार सय्यद इमरान सय्यद इकबाल यांच्या सांगण्यावरून काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सापळा रचून खुडे यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी मुखेड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ मधील कलम ७ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अश्विनी जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक राहुल तरकसे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोलीस निरीक्षक माधुरी यावलीकर व पथकाने केली.

#punyanagari #dainikpunyanagari #Nanded #Mukhed #BriberyCase #ACB #AntiCorruption #LandSurvey #CrimeNews #Maharashtra #TrappedRedHanded #GovernmentOfficial

Nanded, Mukhed, bribery case, land survey report, court submission, Bhumi Abhilekh office, peon Vivekanand Pandurang Khude, Anti-Corruption Bureau, caught red-handed, agricultural land measurement, complainant’s wife, Nimtandar Sayyed Imran Sayyed Iqbal, trap operation, Prevention of Corruption Act 1988, Section 7 and 12, police case registered, Superintendent of Police Shrikrishna Kokate, Additional SP Ashwini Jagtap, Deputy SP Rahul Tarkase, Police Inspector Madhuri Yavalikar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *