मुक्रमाबाद पोलिसांची गुटख्याविरोधात धडक कारवाई; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्तमुखेड(प्रतिनिधी) : -महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनावर मुक्रमाबाद पोलिसांनी कारवाई करत तब्बल ₹५ लाख ५९ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १ सप्टेंबर रोजी लखमापूर फाट्याजवळ करण्यात आली.नांदेड जिल्ह्यात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध विशेष मोहीम सुरू आहे. या अनुषंगाने मुक्रमाबाद पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार लखमापूर फाट्याजवळ पोलिस पथकाने पंचांसह सापळा रचला.यावेळी महिंद्रा मॅक्स वाहन क्रमांक MH-22 N-4672 संशयास्पदरीत्या येताना दिसले. पोलिसांनी वाहन थांबवून पंचांसमक्ष झडती घेतली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पानमसाला, व्ही-१ तंबाखू व इतर तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित पदार्थांची किंमत ₹५९ हजार ७६०, तर वाहनाची किंमत सुमारे ₹५ लाख, असा एकूण ₹५ लाख ५९ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी वाहनातील संशयित मंगेश शिवाजी धोत्रे (वय २८, रा. शिवाजीनगर, मुखेड) व विशाल व्यंकटराव वाघमारे वय 28 राहणार दत्तनगर मुखेड यांच्याविरुद्ध मुक्रमाबाद पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १३४/२०२६ नोंद करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत आहे.ही कारवाई नांदेडचे पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजू चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलिस उपनिरीक्षक शंकर मोरे, पोलिस अंमलदार संदीप देवकत्ते, गंगावरे, लुंगारे, होमगार्ड जाधव, वसंत जाधव आदींचा पथकात सहभाग होता.नांदेड जिल्ह्यात अवैध गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू तसेच इतर प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक, साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.#nanded
मुक्रमाबाद पोलिसांची गुटख्याविरोधात धडक कारवाई; साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्तमु…

















Leave a Reply