शेतातील वीज जोडणीचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू – VastavNEWSLive.com

[ads1]

भोकर : तालुक्यातील रावणगाव शेतशिवारात शेतातील वीज जोडणीचा धक्का लागून ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, आनंद बंडू चंद्रे (वय ३०, रा. रावणगाव, ता. भोकर) हे शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी जात असताना गंगाधर रघुनोबा चंद्रे (वय ७२, रा. रावणगाव) यांनी शेतातील पाळलेला वीजेचा कनेक्शन दिल्याने आनंद यांना विजेचा धक्का बसला. यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी बंडू रघुनोबा चंद्रे (वय ५५, रा. रावणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४७०/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक श्री. झाडे करीत आहेत.


Post Views: 101






[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *