[ads1]
![]()
आसाममधील गुवाहाटी येथून एका तरुणाने लग्नाच्या काही महिन्यांनंतर पत्नीची निर्घृण हत्या केली. आरोपी पतीने पत्नीचे डोके धडापासून वेगळे केले आणि तिच्या दोन्ही हातांची बोटेही कापली. हत्येनंतर पती फरार झाला. रविवारी या प्रकरणाचा खुलासा झाला, जेव्हा शेजाऱ्यांना घरातून तीव्र दुर्गंधी येऊ लागली. तक्रारीनंतर पोलीस अपार्टमेंटमध्ये पोहोचले, पोलिसांनी जेव्हा फ्लॅटचे कुलूप तोडले, तेव्हा खोलीत महिलेचे धड सापडले. खोलीची झडती घेतली असता, फ्रिजमध्ये डोके सापडले. महिलेच्या दोन्ही हातांची बोटेही अर्धी कापलेली होती आणि शरीर सडू लागले होते. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी पतीचा शोध सुरू केला आहे. दोघांमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला होता महिलेची ओळख 25 वर्षीय रिया तालुकदार अशी झाली आहे. रियाचे लग्न सुमारे 6 महिन्यांपूर्वीच गुवाहाटीच्या हाटीगाव परिसरात राहणाऱ्या रामानुजन गोस्वामीसोबत झाले होते. दोघेही फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते. रियाच्या हत्येनंतर रामानुजन फरार आहे. त्याचा मोबाईल फोनही बंद आहे. पोलिसांना शेजाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रिया आणि तिच्या पतीमध्ये कोणत्यातरी गोष्टीवरून जोरदार वाद झाला होता. यानंतर रामानुजन रात्री सुमारे 9 वाजता घरातून बाहेर पडला होता. रिया बुटीकमध्ये काम करत होती, पती कॅब चालक रिया फॅन्सी बाजारच्या एसी मार्केट परिसरात असलेल्या एका बुटीकमध्ये काम करत होती. तिला आई-वडील नव्हते आणि कुटुंबात तिचा फक्त एक भाऊ आहे. त्याला माहिती देण्यात आली आहे. दुसरीकडे, रामानुजन कॅब चालवतो. रामानुजनचे वडिलोपार्जित घर गौरीपूरमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी तिथेही छापा टाकला, पण अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी गुवाहाटी मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल (GMCH) येथे पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आणि तपासानंतर हत्येबाबत आणखी खुलासे होण्याची अपेक्षा आहे.
[ads2]
पतीनं पत्नीचं डोकं कापून फ्रिजमध्ये ठेवलं:दोन्ही हातांची बोटेही कापली, आसाममधील गुवाहाटीची घटना; हत्येनंतर पती फरार
















Leave a Reply