नांदेड येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात मानसी जाधव हिचे दुःखद निधन झाले. वकिलीचे …


नांदेड येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात मानसी जाधव हिचे दुःखद निधन झाले. वकिलीचे स्वप्न पाहणारी आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणारी मानसी आज आपल्यात नाही, ही अत्यंत दुःखद बाब आहे.

आज जाधव कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. या कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास दिला.

ईश्वर मानसीच्या आत्म्यास शांती देवो आणि जाधव परिवाराला हे दुःख सहन करण्याचे बळ देवो.

भावपूर्ण श्रद्धांजली!

#सांत्वनपर_भेट #Condolences #भावपूर्ण_श्रद्धांजली #balajikalyankar #nanded

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *