अमळनेर तालुक्यात पावसाची दडी:67 ‎हजार हेक्टरवरील पिकांची वाढ खुंटली‎, तालुक्यातील खरीप पिकांवर दुष्काळाचे सावट; शेतकरी चिंताग्रस्त‎

[ads1]


गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने अमळनेर तालुक्यातील खरीप पिकांवर दुष्काळाचे सावट पसरले आहे. तालुक्यातील सुमारे ६७ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांची वाढ खुंटली असून कडक ऊन व जमिनीत घटणाऱ्या ओलाव्यामुळे शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. ३० टक्के बागायती क्षेत्रातील शेतकरी विहिरींच्या पाण्यावर पिके जगवण्याची कसरत करत असले, तरी बहुतांश कोरडवाहू क्षेत्रावर मोठे संकट ओढवले आहे. तालुक्यात मका व बाजरी ही पिके फुलोऱ्यात तसेच दाणे भरण्याच्या टप्प्यात असतानाच पाऊस गायब झाल्याने उत्पादनात मोठी घट येण्याची शक्यता आहे. त्यातच कापूस पिकावर अनेक भागांत लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. लागवडीखालील पीकनिहाय क्षेत्र (हेक्टरमध्ये).. कापूस: ४४,१५०, मका: १८,४००, मूग: १,४४०, तूर: ९५०, सोयाबीन: ३६०, उडीद: ३२०, बाजरी: ३१३, भुईमूग: १००, ज्वारी: १००, खत या क्षेत्रावर लागवड करण्यात आली असल्याची माहिती कृषी अधिकारी चंद्रकांत ठाकरे यांनी दिली. ^पिकांच्या वाढीच्या काळातच पाऊस गायब झाल्याने तालुक्यातील खत विक्रेत्यांनाही याचा फटका बसला आहे. खताचा सुमारे ५० टक्के साठा विक्रीअभावी पडून असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पुढील काळात पाऊस झाल्यास युरियाच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. – लालू सेठ, खत विक्रेते, अमळनेर. आठवडाभरात पाऊस आला नाही तर सगळे हातातून जाईल सर्व पैसा बियाणे, खते आणि मशागतीवर खर्च झाला आहे. पाऊस नसल्याने बागायती पिकांत ५० ते ६० टक्के घट येण्याचा अंदाज असून कापसावर लाल्या रोगाने आक्रमण केले आहे. तसेच आठवडाभरात पाऊस आला नाही तर मका पूर्णपणे हातातून जाईल आणि फक्त चारा गोळा करण्याची वेळ येईल. असे संजय पाटील आणि पुरुषोत्तम चौधरी या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *