'तुम्ही कधी विचार केलाय का, देव तुमच्याकडे काय मागतो?':मुख्यमंत्र्यांच्या लेकीचा व्हिडिओ व्हायरल; दिविजा फडणवीसांनी काय सांगितले? VIDEO

[ads1]


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कन्या दिविजा फडणवीस सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नुकताच श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला एक व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपण देवाकडे नक्की काय मागावे आणि काय मागू नये, यावर भाष्य केले आहे. तसेच, खरी भक्ती कशी असावी आणि देवाला भक्तांकडून नेमकी काय अपेक्षा असते, याविषयी दिविजा यांनी अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणारे विवेचन केले आहे. दिविजा फडणवीस यांनी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटले की, आपण सर्वजण देवाकडे काय मागत नाहीत? देवा हे काम कर, देवा ते काम कर परंतु तुम्ही कधी हा विचार केला आहे का? देव तुमच्याकडे काय मागतो? चला तर मी तुम्हाला सांगते. भगवद्गीतामध्ये श्रीकृष्ण सांगतात, जो व्यक्ती त्यांना प्रेम, भक्ती आणि अपुलकीने फळ, फूल, पाणी किंवा एखाद्या झाडाचं पान जरी तुम्ही देवाला अर्पण केलं तर तो भक्त श्रीकृष्णासाठी प्रचंड प्रिय असतो. पुढे दिविजा फडणवीस म्हणतात, असा अर्थ बिलकून नाहीये की, तुम्हाला देवाचा सर्वात प्रिय भक्त होण्यासाठी खूप सारे फळ किंवा फूल अर्पण करण्याची गरज नाही. याचा अर्थ असा की भगवान श्रीकृष्ण तुम्हाला सांगू इच्छितात की, या जगात त्यांच्यासाठी तुमचं प्रेम आणि भक्तीपेक्षा जास्त कोणतीही गोष्ट महत्त्वाची नाहीये. त्यामुळे मी तुम्हाला या श्रीकृष्ण जन्माष्टमीला विनंती करते की, थोडा वेळ काढून देवाकडे भौतिक सुख देणाऱ्या गोष्टी मागू नका. परंतु तुम्ही भगवान श्रीकृष्णावर प्रेम करा. तुम्ही त्यांची अपुलकीने आणि प्रेमाने भक्ती करा, साधना करा, आणि त्यांचं चिंतन करा. हरे कृष्णा’, असे त्यांनी म्हटले आहे.

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *