[ads1]
![]()
मार्च महिन्यात नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ माजली होती. महिलांवर अत्याचार, काळी जादू आणि फसवणूक अशा अनेक गंभीर गुन्ह्यांत अटक झाल्यानंतर पोलिस चौकशीत त्याचे एक-एक हादरवणारे कारनामे समोर आले. दरम्यान, आता या भोंदू बाबा अशोक खरातच्या कुकृत्यांवर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ नावाचा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यात अभिनेत्री दीपाली सय्यद मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. मात्र, या चित्रपटाबाबत बोलताना माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी एक मोठा आणि खळबळजनक खुलासा केला असून, या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. शहाजी बापू म्हणाले की, अशोक खरातवर चित्रीत होत असणाऱ्या ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये एक घोटाळा झाला आहे. अशोक खरात सांगोला तालुक्यात येऊन पूजा करून गेला आहे. उघड्या नागड्या पद्धतीने धिंगाणा घालून सांगोला येथील जवळ्याकडे पूजा केली. माझा भाचा असणाऱ्या अतुल पवारला निवडणुकीत पराभूत करून जीवे मारण्यासाठी पूजा केली. मात्र मी माझ्या भाच्याला सांगितले, तुझा मामा या महाराजाच्या बापाचा बाप आहे. तू मरत नाही काळजी करू नको. त्यामुळे हा प्रसंग अशोक खरात वर चित्रीत होणाऱ्या चित्रपटात घेतला आहे का? असा सवाल त्यांनी केला आहे. सांगोला येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना मेळाव्यात मंत्री भरत गोगावले, मंत्री योगेश कदम आणि अभिनेत्री दिपाली सय्यद उपस्थित होत्या. याप्रसंगी आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिपाली सय्यद यांना उद्देशून अशोक खरातचे कारनामे सांगत माजी आमदार दीपक साळुंखे यांना जोरदार टोला लगावला. दरम्यान, नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात याच्या कुकृत्यांवर आधारित ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, सध्या या आगामी चित्रपटाची राज्यभरात मोठी चर्चा सुरू आहे.
[ads2]
'महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये तो प्रसंग घेतला आहे का?':शहाजी बापू पाटलांचा सवाल, चित्रपटाच्या शूटिंगमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा केला आरोप
















Leave a Reply