वारकरी संप्रदायाने जपलेली समता, बंधुता आणि मानवतेची मूल्ये दैनंदिन व्यवहारात उतरली पाहिजेत. संतांच्या अभंगांचे गायन करताना त्यांच्या विचारांनुसार सन्मानाने वागविण्याची जबाबदारीही माणसांनी स्वीकारली पाहिजे, असे मत जेष्ठ साहित्यीक इंद्रजीत देशमुख यांनी शनिवारी ता. २४ नर्सी नामदेव येथे व्यक्त केले. संत चोखामेळा अध्यासन केंद्र, पुणे, वृंदावन फाऊंडेशन, पुणे आणि श्री संत नामदेव महाराज संस्थान, नरसी नामदेव यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय संमेलनाच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ह.भ.प. डॉ. विठ्ठल जायभाये तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री संत नामदेव महाराज संस्थानचे उपाध्यक्ष भिकाजी किर्तनकार, विश्वस्त मनोज आखरे, सचिन पाटील यांच्यासह मन्यवर उपस्थित होते. यावेळी बोलतांना देशमुख म्हणाले की, “संत चोखामेळा यांच्या अभंगांत विठ्ठलभक्तीबरोबरच माणूस म्हणून स्वीकारले जाण्याची आर्त अपेक्षा आहे. त्यांच्या शब्दांतून व्यक्त होणारी वेदना तत्कालीन समाजव्यवस्थेला प्रश्न विचारते. संतसाहित्याच्या वाचनातून दुसऱ्याच्या दुःखाविषयी संवेदनशीलता निर्माण होणे आणि आपल्या वर्तनात बदल घडणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण, आरोग्य आणि उपजीविकेच्या संधींपासून वंचित असलेल्या माणसाला आधार देण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे. प्रत्येकाला सन्मानाने जगता येणे आणि सार्वजनिक जीवनात समान वागणूक मिळणे, ही समतेची प्रत्यक्ष रूपे आहेत. साहित्य संमेलनातून आपल्या परिसरातील विषमता ओळखून ती कमी करण्याची दिशा मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शंकर पजई यांनी केले. डॉ. किशोर इंगोले यांनी आभार मानले. दोन विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी संमेलनाच्या निमित्ताने हिंगोली जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांमधील, एकल पालकांच्या आधारावर शिक्षण घेत असलेल्या दोन गरजू विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणखर्चाची जबाबदारी वृंदावन फाऊंडेशनने स्वीकारली असल्याचे यावेळी जाहिर करण्यात आले. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 11 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation मॅग्नेट 2.0 अंतर्गत एक हजार कोटींचे मेगा क्लस्टर्स उभारणार:बाजार समित्यांचे डिजिटायझेशन; एआयच्या मदतीने शेतकऱ्यांना मिळेल बाजारभावाचा अंदाज