मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या कथित 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ माजला असताना, शिवसेना नेते बच्चू कडू यांनी या प्रकरणावर अत्यंत खळबळजनक भाष्य केले आहे. “500 कोटींचा एवढा मोठा आक . पुणे येथे पत्रकारांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी या ऑडिओ क्लिपची पार्श्वभूमी, प्रसारमाध्यमांचे वार्तांकन, दुष्काळी परिस्थिती, नागपूरमधील घटना आणि महायुतीतील अंतर्गत समीकरणांवर अत्यंत परखड भूमिका मांडली. 500 कोटी हा लहान विषय नाही ऑडिओ क्लिपमधील 500 कोटींच्या दाव्यावर आणि त्यातील संभाषणावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, “500 कोटी हा काही लहान विषय नाही. ज्या काळातील ही क्लिप सांगितली जाते, त्या काळात असे कुठलेही चित्र स्पष्ट दिसत नाही. त्या क्लिपमधील महिलेला मी ओळखत नाही; मात्र सिस्टीममध्ये मी किती मोठी आहे आणि मला सर्वकाही ठाऊक आहे, असा आव आणण्याचा आणि स्वतःचा मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न त्या संभाषणात झाला आहे. पत्रकार जशा कधीकधी गोष्टी रंगवून सांगतात, तसाच हा आपापली बडाई मारण्याचा प्रकार आहे. त्यातून हा एवढा मोठा डोंगर उभा केला गेला आहे की दोन पक्षांमध्ये मोठी फूट पडते की काय, अशी अवस्था निर्माण झाली.” कारकुनाने केलेला गेम “यामागे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा सहभाग असेल असे मला वाटत नाही, कारण वरिष्ठ नेत्यांनी अशा खालच्या पातळीचे राजकारण करू नये. हे एका कारकुनाने केलेले काम आहे. ज्या कार्यालयातून किंवा बैठकीतून हे संभाषण झाले, तेथील कारकुनाने झारीतील शुक्राचार्यासारख्या अनेक ऑडिओ रेकॉर्डिंग्ज जमा केल्या आणि त्या बाहेर दिल्या, असे एकंदरीत चित्र दिसते.” शिंदे आणि भाजप दोघांचीही बदनामी; ‘झारीतील शुक्राचार्य’ शोधून काढा! या क्लिपमुळे कोणाचे नुकसान झाले, याचे विश्लेषण करताना त्यांनी नमूद केले की, “ही क्लिप बाहेर आल्यामुळे एका बाजूला एकनाथ शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा 100 टक्के प्रयत्न झाला आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजपचीही मोठी बदनामी झाली आहे. निवडणुका जिंकण्यासाठी भाजप कशा क्लृप्त्या वापरते, हेही यातून बाहेर पडले आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात नेमका फायदा कोणाचा झाला, हे तपासणे अत्यंत आवश्यक आहे.” एकत्र बसून छडा लावावा “या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे. अशी गोपनीय संभाषणे जाणीवपूर्वक बाहेर काढून ऐन वेळी का आणली गेली, याचे संशोधन झाले पाहिजे. महायुतीमधील दोन्ही प्रमुख नेत्यांनी एकत्र बसून ही क्लिप पूर्ण ऐकली पाहिजे आणि यातील ‘झारीतील शुक्राचार्य’ शोधून काढला पाहिजे.” राज्यात दुष्काळ असताना राजकीय वाद थांबवा राज्यातील वास्तव प्रश्न आणि नागपुरातील कथित वादावर त्यांनी माध्यमांनाही सुनावले. “सध्या राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे, शेतकऱ्यांचे जगण्याचे प्रश्न ऐरणीवर आहेत. जनतेचे लक्ष दुसरीकडे भरकटवण्यापेक्षा सरकारने आणि सर्व पक्षांनी शेतकरी बांधवांना कशी मदत करता येईल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. वाद हा मुद्द्यांवर झाला पाहिजे, केवळ बदनामीच्या राजकारणावर नाही.” नागपूर घटनेवरून माध्यमांना खडे बोल “नागपूरमध्ये दसऱ्याच्या रात्री घडलेल्या एका वादात ‘आमदाराचा खाजगी पीए’ असल्याचे वृत्त चालवले गेले. आमदाराला खाजगी पीए नेमण्याचा कोणताही शासकीय अधिकार नसतो, तो केवळ मंत्र्यांना असतो. तो संबंधित व्यक्ती माझा कार्यकर्ता असू शकतो आणि कार्यकर्ता असणे आम्ही मान्य करतो; परंतु खाजगी पीए म्हणून बातमी चालवणे हे चुकीचे आहे. केवळ ब्रेकिंग न्यूजसाठी माध्यमांनी अभ्यास न करता अकलीचे घोडे नाचवू नयेत,” असा टोला त्यांनी लगावला. महायुती तुटेल हा टीव्हीपुरता आभास; निकालानंतर चित्र स्पष्ट होईल विधान परिषदेच्या (पदवीधर व शिक्षक) निवडणुकांमधील बंडखोरीवर आणि महायुतीतील भविष्यावर भाष्य करताना ते म्हणाले, “जिथे पर्यायाची गरज नसते, तिथे स्थानिक पातळीवर स्वातंत्र्य किंवा बंडखोरी दिसते. मात्र, या एका ऑडिओ क्लिपवरून किंवा स्थानिक वादांवरून लगेच युती तुटेल, सरकार पडेल आणि मोठा राजकीय भूकंप होईल, हा सगळा गोंधळ फक्त टीव्हीच्या पडद्यापुरता मर्यादित आहे. जमिनीवर मतदार आणि राजकारणी दोघेही अत्यंत हुशार आहेत. त्यामुळे अशा गोष्टींवरून कोणीही लगेच हबकून जाण्याचे कारण नाही.” ———————————————————- हेही वाचा… ‘मला बदनाम करण्यासाठी 500 कोटींचा घाट का घातला?’: मनोज जरांगेंचा संतप्त सवाल; ऑडिओ क्लिप खरीच असल्याचा दावा मराठा आंदोलन चिरडण्यासाठी आणि आपल्याला बदनाम करण्यासाठी 500 कोटी रुपयांचा घाट का घातला, असा सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केला आहे. समाजातील तरुणांना ईडी आणि एसआयटीच्या धमक्या देऊन फोडण्याचे षड्यंत्र रचले जात असल्याचा आरोप करत, या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्य बाहेर काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच, व्हायरल होत असलेली ऑडिओ क्लिप ‘एआय’ने बनवलेली नसून ती खरी आहे आणि पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांनीही याची दखल घेतली असल्याचे सांगत जरांगे यांनी या प्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 5 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation नांदेडमध्ये 10 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याचा फायनान्स कंपनीत संशयास्पद मृत्यू:मारहाण करून आत्महत्येचा बनाव रचल्याचा कुटुंबीयांचा आरोप