दारात कुत्रे भुंकल्याने घरात पळालेली ३ वर्षीय मुलगी चुलीवर ठेवलेल्या गरम दुधाच्या पातेलाला धडकली. गरम दूध अंगावर पडल्याने भाजून तिचा मृत्यू झाला. बीड तालुक्यातील नांदूर हवेली येथे गुरुवारी ही घटना घडली. दूर्गा प्रदीप बुधनर असे मृत मुलीचे नाव आहे. दुर्गा ही गुरुवारी दुपारी घराच्या जवळच खेळत होती. घरासमोर कुत्रा भुंकून आपल्या दिशेने धावल्याने घाबरलेली दूर्गा घरात पळाली. अंगणात चुलीवर तापत ठेवलेले दूधाच्या पातलेला जाऊन ती धडकून खाली पडली. गरम दूधाचे पातेले अंगावर पडल्याने ति भाजली. उपचारासाठी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती अचानक गंभीर झाली. त्यानंतर पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले मात्र तिथेही उपचार होऊ शकले नाहीत. अखेर तिची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. दसऱ्यालाच झाला होता दुर्गाचा वाढदिवस मृत दूर्गा िहचा तिसरा वाढदिवस दोन दिवसांपूर्वी म्हणजे दसऱ्याच्या दिवशीच झाला होता. कुटुंबाने उत्साहात दुर्गाचा वाढदिवस साजरा केला. मात्र , दोन दिवसांतच दूर्गाचा अशा प्रकारे मृत्यू झाला. मला डॉक्टर व्हायचे असे वाढदिवसाच्या दिवशी ती म्हणाली होती. तिच्या या आठवणींनी कुटुंबियांनी हंबरडा फोडला.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search