वॉशिंग्टन (प्रतिनिधी)- मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला उद्देशून महत्त्वपूर्ण भाषण केले. अमेरिका, इज्राएल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक परिस्थिती तणावपूर्ण बनली असून नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन ट्रम्प यांनी केले.काही वेळा पूर्वीच ते अमेरिकन जनतेला संबोधन करीत होते.
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकेने घेतलेली लष्करी कारवाई ही राष्ट्रीय सुरक्षा आणि मित्रदेशांच्या संरक्षणासाठी आवश्यक होती. इराणकडून निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्याला आळा घालणे हे या कारवाईमागील प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.असे असेल तर आपले हजारो सैनिक इराणच्या जवळ का पाठवले हे मात्र त्यांनी संगितले नाही. तसेच इराण कडून आम्हाला धोका आहार असे कोणत्या देशाने अमेरिकेला सहीतले होते हे सुद्धा स्पष्ट केले नाही.
भाषणादरम्यान ट्रम्प यांनी युद्ध दीर्घकाळ चालणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. परिस्थिती नियंत्रणात असून राजनैतिक चर्चेद्वारे संघर्ष कमी करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. काही स्तरांवर युद्धबंदीबाबत सकारात्मक संकेत मिळत असल्याचाही दावा त्यांनी केला.अमेरिकन सैन्य पूर्ण तयारीत असून देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली जाणार नाही, असा इशाराही राष्ट्राध्यक्षांनी दिला. मध्यपूर्वेतील तेल वाहतुकीचे महत्त्वाचे मार्ग सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
अमेरिकन नागरिकांना संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिका मजबूत आहे, परिस्थितीवर आमचे नियंत्रण आहे आणि अंतिम उद्दिष्ट शांतता व स्थैर्य प्रस्थापित करणे हेच आहे. त्यांनी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीवर भरोसा ठेवावा, असे आवाहन केले.पण इराणने युद्धबंदी साठी आम्ही विनंती केल्याच्या शब्दांचा विरोध केला आहे. दरम्यान, या संघर्षाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले असून पुढील काही दिवसांत राजनैतिक हालचालींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
