महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने दिवाळीच्या सुट्टीत आयोजित केलेली शिक्षकांची सक्तीची प्रशिक्षणे तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. समितीने शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि शिक्षण आयुक्तांकडे हे साकडे घातले आहे. शिक्षकांच्या अधिकृत सुट्ट्यांमध्ये प्रशिक्षणे ठेवल्याने त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक नियोजनात अडथळे येत आहेत. दिवाळी हा महत्त्वाचा सण असून, या काळात शिक्षकांना कुटुंबीयांसोबत वेळ घालवायचा असतो. वर्षभराच्या कामांनंतर मानसिक विश्रांतीसाठी ही सुट्टी महत्त्वाची आहे. अनेक शिक्षकांनी प्रवास किंवा वैद्यकीय उपचारांचे नियोजन केले आहे. समितीने सुचवले आहे की, परीक्षा वेळापत्रकातील बदलांमुळे मिळणाऱ्या वेळेत किंवा ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षणे घ्यावीत. प्रशिक्षणासाठी यापूर्वी शुल्क भरलेल्या शिक्षकांकडून पुन्हा शुल्क आकारू नये, अशा नऊ मागण्या समितीने केल्या आहेत. मंत्री दादा भुसे यांनी तात्काळ निर्णय दिला नाही. समिती पुन्हा मंत्र्यांना भेटणार आहे.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

Home
Account
Cart
Search