नागपुरात पकडलेल्या प्रतिबंधित नायलॉन मांजाच्या तपासातून दादरा आणि नगर हवेलीतील एका कारखान्याचा पर्दाफाश झाला. नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘मार्मिक इंडस्ट्रीज’वर छापा टाकत ६.२६ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ८ डिसेंबर २०२५ रोजी कळमेश्वरमधील गोंडखैरी येथील व्हीआरएल लॉजिस्टिक यार्डमध्ये एका कंटेनरमधून १४.४० लाख रुपयांचा नायलॉन मांजा जप्त झाला होता. त्यावेळी कंटेनरचालक छविनाथ मोहन निषाद (३०, रा. उत्तर प्रदेश) याला अटक झाली होती. या तपासातून दादरा आणि नगर हवेलीतील डेमीनी रोडवरील ‘मार्मिक इंडस्ट्रीज’चा पत्ता लागला. कारखान्यात ८८ हजारांहून अधिक नायलॉन मांजाच्या चक्र्या (५.०९ कोटी रुपये), ९५ लाख रुपयांची यंत्रसामग्री, कच्चा माल आणि पॅकिंग साहित्य जप्त झाले. ‘गोल्ड’, ‘शक्ती’, ‘कोब्रा’ यांसारख्या विविध ब्रँडच्या नावाने हा मांजा तयार होत होता. कारखान्याचा मालक आणि वितरणाचे जाळे याचा तपास अजून सुरू आहे. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 7 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation महाराष्ट्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करू नये:4,500 रुपये पहिली उचल द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करणार : राजू शेट्टींचा इशारा अमरावतीत एकाच दिवशी 9 बालकांना मिळाले नवीन कुटुंब:जिल्हाधिकारी येरेकर यांनी दत्तक प्रक्रियेचे आदेश मंजूर केले, आयुष्यात आली नवी आशा