१९ वर्षांखालील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने गौरव; युवा खेळाडूंसाठी ठरणार प्रेरणादायी नांदेड (प्रतिनिधी) – रत्नागिरी येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील (U-19) राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या औचित्याने क्रिकेट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नांदेडचे भूमिपुत्र, रणजी क्रिकेटपटू सुनील गंगाधरराव जाधव आणि सुनील यादव यांचा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुनील जाधव यांनी अत्यंत कमी वयात रणजी क्रिकेट खेळण्याचा मान मिळवला असून, त्यांनी आपल्या पदार्पणाचा सामना रत्नागिरी येथेच खेळला होता. त्यांच्या या क्रिकेट प्रवासातील अनुभव आणि योगदानाचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. तसेच महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुनील यादव यांच्याही उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांचाही सन्मान करण्यात आला. या सत्कारामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या नवोदित क्रिकेटपटूंना मोठी प्रेरणा मिळाली आहे. कष्ट, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर क्रिकेट क्षेत्रात यश मिळवता येते, हेच या दोन्ही खेळाडूंच्या प्रवासातून दिसून येते. या सन्मानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आणि क्रीडाप्रेमींनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांनीही सुनील जाधव व सुनील यादव यांचे विशेष अभिनंदन केले. या गौरव सोहळ्यामुळे नांदेडसह संपूर्ण क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. Post Views: 18 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 9 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation ३६ मिनिटांचा तो व्हिडिओ, ज्याने दिल्लीपासून मुंबईपर्यंत सरकारची झोप उडवली! – VastavNEWSLive.com नांदेड विभागातील ७१ रेल्वे स्थानकांवर रेल जनसंवाद आणि स्वच्छता अभियानाचे आयोजन
१९ वर्षांखालील राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने गौरव; युवा खेळाडूंसाठी ठरणार प्रेरणादायी नांदेड (प्रतिनिधी) – रत्नागिरी येथे सुरू असलेल्या १९ वर्षांखालील (U-19) राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेच्या औचित्याने क्रिकेट क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल नांदेडचे भूमिपुत्र, रणजी क्रिकेटपटू सुनील गंगाधरराव जाधव आणि सुनील यादव यांचा रत्नागिरीचे जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुनील जाधव यांनी अत्यंत कमी वयात रणजी क्रिकेट खेळण्याचा मान मिळवला असून, त्यांनी आपल्या पदार्पणाचा सामना रत्नागिरी येथेच खेळला होता. त्यांच्या या क्रिकेट प्रवासातील अनुभव आणि योगदानाचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. तसेच महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सुनील यादव यांच्याही उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांचाही सन्मान करण्यात आला. या सत्कारामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या नवोदित क्रिकेटपटूंना मोठी प्रेरणा मिळाली आहे. कष्ट, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर क्रिकेट क्षेत्रात यश मिळवता येते, हेच या दोन्ही खेळाडूंच्या प्रवासातून दिसून येते. या सन्मानाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आणि क्रीडाप्रेमींनी दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. युवा साहित्यिक सोनू दरेगावकर यांनीही सुनील जाधव व सुनील यादव यांचे विशेष अभिनंदन केले. या गौरव सोहळ्यामुळे नांदेडसह संपूर्ण क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. Post Views: 18 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation