गडचिरोलीतील अनुकूल अधिवास आणि मुबलक अन्न-पाण्याच्या उपलब्धतेमुळे हत्तींचे या भागात कायमस्वरूपी वास्तव्य निर्माण होत आहे. हे लक्षात घेऊन वन खात्याने स्थानिक नागरिक आणि हत्ती यांच्यात सुरक्षित व समृद्ध सहजीवन निर्माण करण्यासाठी सकारात्मक पावले उचलली आह
.
हत्ती जिल्ह्यातील वडसा वनविभागात ऐतिहासिकदृष्ट्या आशियाई हत्तींचे कायमस्वरूपी वास्तव्य नव्हते. परंतु, २०१९ मध्ये छत्तीसगडमधून गोंदियामार्गे आलेल्या २ हत्तीनंतर, नोव्हेंबर २०२१ मध्ये २३ हत्तींच्या कळपाचे आगमन झाले. सध्या नव्या पिलांच्या जन्मानंतर ही संख्या ३३ वर पोहोचली आहे. अरमोरी, पोरला व चातगाव/वडसा वनपरिक्षेत्रातील बांबूची जंगले, तलाव-पाणवठे, मोहफुले आणि भात-मक्याची शेती या अनुकूल पर्यावरणामुळे हत्ती याच भागात स्थिरावले आहेत.
वेळेवर पूर्वसूचना
एसएमएस, मोबाइल ॲप आणि सायरनद्वारे ग्रामस्थ व वन कर्मचाऱ्यांना पूर्वसूचना मिळून जीवित व वित्तहानी टळेल. Â २०२१-२२ मधील ₹८.६९ लाखांपासून २०२५-२६ पर्यंत भरपाईचा आकडा ₹३.३१ कोटींवर पोहोचला असून, एकूण भरपाई ₹१०.७ कोटींवर गेली आहे. एआय प्रणालीमुळे ७०-८०% संघर्ष कमी होऊन शासनाच्या निधीची वार्षिक अंदाजे ₹२.५ ते ३.५ कोटींची बचत होऊ शकेल आणि दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य लाभेल. Â वन विभाग, पोलिस विभाग आणि स्थानिक यंत्रणांमध्ये जलद माहितीची देवाणघेवाण व समन्वय वाढण्याची शक्यता आहे.
एकत्रित विचार करावा लागेल
हत्तींचे वास्तव्य दीर्घकालीन ठरल्यास त्यांच्या स्थलांतर मार्गिका, खाद्य-पाण्याची उपलब्धता आणि गावांशी असलेला संपर्क यांचा शास्त्रीय अभ्यास महत्त्वाचा ठरेल. केवळ हत्तींच्या हालचाली टिपण्यापेक्षा संभाव्य धोक्याची वेळेत सूचना देणारी यंत्रणा, प्रशिक्षित पथके आणि अधिवास व्यवस्थापन यांची सांगड घालणे आवश्यक आहे. त्यामुळे हत्तींचे संरक्षण आणि स्थानिक नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही बाबींचा एकत्रित विचार करावा लागेल.
मार्व्हलला दिला प्रस्ताव
मानव-हत्ती संघर्ष प्रभावीपणे कमी करण्यासाठी आणि पूर्वसूचना देणारी यंत्रणा उभी करण्यासाठी वडसा उपवनसंरक्षक वरुण बी. यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) गडचिरोली, जी. पी. नरवणे यांच्या माध्यमातून मार्व्हल, नागपूर यांच्याकडे एआय प्रणालीचा महत्त्वपूर्ण प्रस्ताव सादर केला आहे. १४ ऑगस्टच्या महसूल विभागस्तरीय टायगर सेलच्या बैठकीतील चर्चेनुसार हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. Â प्रस्तावात हत्तींच्या दृष्टीने अतिसंवेदनशील अशा ४५ गावांची निवड करण्यात आली आहे. Â प्रत्येक गावासाठी २४ याप्रमाणे एकूण १,०८० एआय-सक्षम बायोव्हिज्युअल युनिट्सद्वारे दिवस-रात्र हत्तींच्या हालचालींवर व दिशांवर नजर असेल.
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad