सहा हजार वर्षांच्या सभ्यतेचा जाहीर प्रतिकार   – VastavNEWSLive.com


मेरिका आणि इजरायलने संयुक्तपणे हल्ला केल्यानंतर जगात अनेक घटना घडत आहेत आणि त्यातून एक गोष्ट स्पष्ट दिसते इराण हे युद्ध अत्यंत चिवटपणे आणि ठामपणे लढत आहे. सुरुवातीला असा समज होता की अमेरिका आणि इजरायलच्या संयुक्त आक्रमणानंतर इराण काही दिवसांत शरण येईल. पण बारा दिवस उलटून गेले तरी परिस्थिती उलटी दिसते आहे. इराण अजूनही ताठ उभा आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या युद्धाबाबतची आपली उद्दिष्टे आणि विधानं सतत बदलताना दिसत आहेत. त्यांच्या बोलण्यात सातत्य नाही. परंतु इराणच्या नेतृत्वाच्या भूमिकेत मात्र स्पष्टता आणि एकवाक्यता आहे कोणत्याही परिस्थितीत आम्ही माघार घेणार नाही.

इराणचे नेते वारंवार सांगतात की इराण ही सहा हजार वर्षांची प्राचीन संस्कृती असलेली सभ्यता आहे. या भूमीवर अनेक आक्रमक आले, साम्राज्ये उभी राहिली आणि नष्ट झाली; पण इराणचे नाव आणि त्याची ओळख कायम राहिली. कारण इराण ही फक्त भौगोलिक सीमा नाही, तर हजारो वर्षांच्या इतिहासाने घडलेली संस्कृती आहे.

मुळात आजचे इराण हे प्राचीन पर्शियन साम्राज्याचे वारसदार आहे. या समाजाची मानसिकता तीन गोष्टींवर उभी आहे पराभवाची जाणीव, मृत्यूची भीती न बाळगणे आणि धर्माशी असलेली खोल बांधिलकी. त्याचबरोबर विज्ञान, शिक्षण आणि राजकीय संघटनाही त्यांच्या समाजात प्रचंड प्रभावी आहेत.

जगात अनेकांना वाटते की इराण म्हणजे मागास, कट्टर आणि अफगाणिस्तानसारखा देश. पण वास्तव वेगळे आहे. Iran मध्ये आज 98 टक्के महिला साक्षर आहेत. त्यापैकी सुमारे 60 टक्के महिला कामकाजात सक्रिय आहेत आणि वैज्ञानिक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर महिलांचा सहभाग आहे. स्वतःच्या तंत्रज्ञानावर अवकाशात उपग्रह सोडणाऱ्या देशांमध्ये इराणचा समावेश होतो.

इराणमधील सर्वोच्च नेतृत्वाची रचना देखील वेगळी आहे. तेथे सर्वोच्च नेते निवडण्यासाठी 88 सदस्यांची समिती असते. ही समिती त्या व्यक्तीची पात्रता तपासून सर्वोच्च नेता निवडते. एखादा नेता मारला गेला तरी लगेच दुसरा पर्याय तयार असतो; आणि त्या पर्यायांनाही पर्याय असतात. त्यामुळे नेतृत्व संपवून देशाला अस्थिर करण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी होते.

इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनाई अनेक दशकं सत्तेवर राहिले, पण तरीही त्यांनी आयुष्यभर साध्या घरात राहणे पसंत केले. आजही इराणचे अनेक वरिष्ठ नेते अत्यंत साध्या जीवनशैलीसाठी ओळखले जातात. ही गोष्ट त्यांच्या समाजात प्रचंड नैतिक ताकद निर्माण करते.

इराण-इराक युद्धाच्या काळातही इराणने आठ वर्षे प्रचंड संघर्ष केला. त्या युद्धात इराकला अमेरिकेचा मोठा पाठिंबा होता, तरीही इराण कोसळला नाही. म्हणूनच आजही अमेरिकेचा हा समज चुकीचा ठरतो आहे की इराणला काही दिवसांत गुडघे टेकवता येईल.

आजच्या घडीला इराणकडे अत्यंत प्रगत क्षेपणास्त्र तंत्रज्ञान आहे. आवाजापेक्षा जास्त वेगाने जाणारी क्षेपणास्त्रे त्यांनी विकसित केली आहेत. त्यांच्या क्षेपणास्त्रांची मारक क्षमता हजारो किलोमीटरपर्यंत पोहोचते.

दुसरीकडे इजरायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या धोरणांवर जगभर टीका होत आहे. गाझामध्ये झालेल्या विध्वंसामुळे अनेकांना 20व्या शतकातील हुकूमशहा अडाल्फ हिलतर r यांची आठवण होत असल्याचे मत अनेक विश्लेषक मांडतात.

भारताच्या भूमिकेबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांच्या परराष्ट्र धोरणामुळे भारताची पारंपरिक मित्रदेशांशी असलेली समीकरणे बदलत असल्याची टीका काही राजकीय विश्लेषक करत आहेत. तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देखील सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

आज जगाचे लक्ष एका प्रश्नावर खिळले आहे अमेरिका, इजरायल आणि इराण यांच्यातील हा संघर्ष नेमका कुठे जाऊन थांबणार? कारण हे युद्ध केवळ तीन देशांपुरते मर्यादित राहिले तरच जगासाठी चांगले आहे; अन्यथा त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होऊ शकतात.

इतिहासाने एक गोष्ट वारंवार सिद्ध केली आहे ज्या देशाची संस्कृती खोल आणि जनतेची मानसिकता लढाऊ असते, तो देश फक्त सैन्यशक्तीने मोडता येत नाही. इराणची आजची भूमिका त्याच गोष्टीची आठवण करून देते.

सोर्स ….

वाचकांना नम्र विनंती आहे की आम्ही दिलेली सोर्स लिंक जरूर पाहावी त्यातील काही शब्द काही वाक्य आम्ही आमच्या लिखाणात लिहिलेली नाहीत. जी वाक्ये आणि शब्द भारत देशाच्या संदर्भाने आहेत  …. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *