[ads1]
![]()
भंडारा जिल्ह्यातील लाखनी आणि साकोली तालुक्याच्या हद्दीवरील मानेगाव पिंपळगाव गावाजवळ आज पहाटे 3 वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला. मोटघरे पेट्रोलपंपाजवळ भरधाव ट्रक आणि कारचा जोरदार धडक झाली. मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात इतका भीषण होता की कार थेट ट्रकमध्ये जाऊन घुसली. या अपघातात आठ जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ट्रकमध्ये पूर्णपणे अडकलेली चारचाकी बाहेर काढण्यासाठी दोन जेसीबीची मदत घ्यावी लागली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरू केले. …हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत
[ads2]
भंडाऱ्यात भीषण अपघात:ट्रक-कारच्या धडकेत 8 जणांचा मृत्यू, लाखनी-साकोली परिसरातील घटना
















Leave a Reply