पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला:गुरुद्वारात फिरत असताना घडला प्रकार; वाचवण्याच्या प्रयत्नात एक पोलिस कर्मचारी जखमी




नांदेडमध्ये शिरोमणी अकाली दलाचे (SAD) अध्यक्ष आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर गुरुवारी हल्ला करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, नांदेड येथील गुरुद्वारा माता साहिब कौरमध्ये एका निहंगाने त्यांच्यावर कृपाणाने हल्ला केला. या हल्ल्यात बादल यांच्या हाताला दुखापत झाली आहे, तर त्यांच्या सुरक्षेत तैनात असलेला एक पोलिस कर्मचारीही जखमी झाला आहे. गुरुद्वारात प्रार्थनेसाठी आले होते सुखबीर सिंग बादल माहितीनुसार, सुखबीर सिंग बादल कुटुंबासह नांदेडला पोहोचले होते आणि गुरुद्वारा माता साहिब कौरमध्ये प्रार्थनेसाठी गेले होते. याच दरम्यान तेथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. सखोल तपास करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडचे पोलिस अधीक्षकांशी संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती घेतली. हल्लेखोराला तातडीने अटक करण्यात आल्याची माहिती त्यांना देण्यात आली. हल्ल्यामागील नेमके कारण काय आहे, याचा सखोल तपास करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले असून, सुखबीर सिंग बादल यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. हल्ल्याचे फोटोज…
हाताला दुखापत, पोलिस कर्मचारी जखमी हल्ल्यादरम्यान बादल यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यानेही हल्लेखोराला थांबवण्याचा प्रयत्न केला, ज्यात तोही जखमी झाला. घटनेनंतर सुखबीर बादल यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा आहे. पोलिसांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित सुरक्षा कर्मचारी आणि इतर लोकांनी हल्लेखोराला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह सुखबीर सिंग बादल यांच्यासारख्या मोठ्या राजकीय नेत्यावर धार्मिक स्थळी धारदार शस्त्राने हल्ला झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींकडून माहिती गोळा केली जात आहे. दोन वर्षांपूर्वीही झाला होता जीवघेणा हल्ला ४ डिसेंबर २०२४ रोजी अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात (गोल्डन टेंपल) सुखबीर सिंग बादल यांच्यावर खलिस्तानी दहशतवादी नारायण सिंह चौडा याने गोळीबार केला होता. त्यावेळी बादल हे सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ सेवादार म्हणून धार्मिक सेवा बजावत होते. गोळीबार होताच साध्या वेशातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत हल्लेखोराचा हातवर ढकलला. त्यामुळे गोळी बादल यांना न लागता मंदिराच्या भिंतीवर जाऊन आदळली. या हल्ल्यात सुखबीर सिंग बादल थोडक्यात बचावले होते. आम्ही हे सातत्याने अपडेट करत आहोत…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *