![]()
प्रतिनिधी | नाशिकरोड नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा देण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेले लाईनमन हे महावितरण आणि नागरिकांमधील महत्त्वाचा दुवा आहे. तसेच ते महावितरणचा चेहरा सुद्धा आहेत. असा संवाद नाशिक परिमंडलाच्या पायाभूत आराखडा मंडळाचे अधिक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी साधला. लाईनमन कृतज्ञता दिना”निमित्त (दि.४) लाईनमन चा गौरव सोहळा मंजुळा मंगल कार्यालयात पार पडला. यावेळी सायनेकर म्हणाले की, नागरिकांचा संवाद संपर्क सर्वात आधी महावितरणच्या लाईनमन यांच्यासोबत होतो. त्यांच्या नम्र सेवेमुळेच महावितरणची चांगली प्रतिमा निर्माण होते. त्यामुळे महावितरणचे आणखी प्रतिमा उजळण्यासाठी लाईनमन यांनी तत्पर राहून नागरिकांची सेवा केली पाहिजे, स्वतःच्या सुरक्षेला देखील प्राधान्य दिले पाहिजे. कार्यक्रमाला नाशिक मंडळाचे अधिक्षक अभियंता राजेश थूल, चंद्रकांत खाडे, विकास आढे उपस्थित होते.
लाईनमन हे महावितरणचा चेहरा:लाईनमन कृतज्ञता दिनानिमित्त सत्कार साेहळ्यात अधिकाऱ्यांकडून काैतुक
