प्राणीमित्र पद्धतीने होळी-रंगपंचमी साजरी करू या  


·    पाळीव किंवा भटके प्राणी, पक्ष्यांना सुकाओला रंग लावू नका

 नांदेड दि. 2 मार्च :-  प्राण्यांना सणांची समज नसतेत्यांच्यासाठी मोठा आवाजअचानक अंगावर येणारे रंगपाण्याचे फुगे आणि आक्रमक वर्तन अत्यंत भीतीदायक आणि जीवघेणे ठरू शकते. रासायनिक रंगांमुळे त्यांची त्वचा आणि डोळे जळू शकतात. नागरिकांनी हा रंगांचा सण साजरा करत असतांना भटके कुत्रेमांजरगुरेपक्षी किंवा पाळीव प्राणी यांना कोणत्याही प्रकारचा ताणइजा किंवा त्रास होणार नाहीयाची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

होळी हा आनंदमैत्री आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेला सण आहे. यंदा हा सण मंगळवार मार्च 2026 रोजी देशभरात साजरा केला जाणार आहे. भारतीय जीवजन्तु कल्याण बोर्ड (AWBI) च्या मार्गदर्शक सूचनुनुसार नागरिकांनी हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की प्राण्यांना वेदनादुखापत किंवा त्रास देणे हा प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा कायदा, 1960 (Prevention of Cruelty to Animals Act, 1960) अंतर्गत शिक्षेस पात्र गुन्हा आहे. तसेच सण दयाळूपणे साजरा करणे हे केवळ आपले नैतिक कर्तव्यच नाही तर प्राण्यांच्या कल्याणाशी संबंधित कायद्यानुसार बंधनकारक देखील आहे.

 

नियमांचे पालन करा

·  पाळीव प्राणीभटके प्राणी आणि पक्षी यांच्यावर सुका किंवा ओला रंग लावणे टाळा.

·  प्राण्यांवर पाण्याचे फुगे फेकू नका किंवा रंगीत पाणी उडवू नकाकारण यामुळे ते घाबरू शकतात आणि त्यांना गंभीर दुखापत होऊ शकते.

·  आपले पाळीव प्राणी घरात किंवा सुरक्षित आणि शांत ठिकाणी असल्याची खात्री करा आणि भटक्या प्राण्यांना गर्दीच्या किंवा गोंधळाच्या ठिकाणांपासून दूर राहण्यास मदत करा.

· सण साजरा केल्यानंतर परिसराची स्वच्छता राखा आणि प्राण्यांच्या पोटात हानिकारक पदार्थ जाऊ नयेत यासाठी रंगांचे अवशेषप्लास्टिकचा कचरा आणि फुगे गोळा करून त्यांची योग्य विल्हेवाट लावा.

·    होळी प्राण्यांना अनुकूल आणि दयाळूपणे साजरी करण्याबाबत लहान मुलेमित्र आणि शेजाऱ्यांमध्ये जनजागृती करा.

·    एखाद्या प्राण्याच्या अंगावर रंग पडल्यास किंवा त्याला दुखापत झाल्यासस्वच्छ पाण्याने तो भाग हळुवारपणे धुवा आणि त्वरित पशुवैद्यकीय मदत घ्या.

·   केवळ मानवांसाठी नैसर्गिक रंगांचा वापर करा आणि शांततापूर्णपर्यावरणपूरक आणि क्रूरता मुक्त उत्सवाला प्रोत्साहन देऊन जबाबदारीने सण साजरा करा.

या होळीमध्ये आपण उत्साहापेक्षा सहानुभूतीगोंधळापेक्षा दयाळूपणा आणि हानी पेक्षा मानवतेला प्राधान्य देऊ या. खऱ्या अर्थाने रंगतदार होळी तीच असते ज्यामध्ये कोणत्याही सजीव प्राण्याला दुखापत होत नाही. “सुरक्षित खेळा. दयाळूपणे खेळा. क्रूरतेशिवाय होळी साजरी करा.” असे आवाहन SPCA समिती आणि जिल्हा प्रशासन नांदेड यांच्यावतीने केले आहे.






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *