![]()
आम्ही सर्वांनी ठरवले आहे की देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवले आहेत अशी जाहिरात द्यायची.संसदेचे अधिवेशन सुरू होऊन दोन आठवडे उलटले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा सभागृहात उपस्थित राहिले नसल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री सभागृहात येण्यास घाबरत आहेत का? जर संसद चालवायचीच नव्हती, तर संसदेची नवीन इमारत कशासाठी उभारली? त्यांनी सोशल मीडियावरच संसद चालवावी, असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, संसदेचे कामकाज सुरू असताना देशाचे प्रमुख नेते सभागृहात अनुपस्थित राहत असतील, तर त्यांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरतो का? या गोष्टीचा विचार भाजपच्या खासदारांनी केला पाहिजे. आम्ही आज सभागृहात गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार असल्याचे सांगत, लोकांसमोर जाण्यास आणि प्रश्नांना तोंड देण्यास सरकार का घाबरत आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. चोऱ्या-धमक्या देऊन मिळालेली सत्ता त्रास देतेय संजय राऊत म्हणाले की, चोऱ्या, मारामाऱ्या आणि धमकावून तुम्ही निवडणुका जिंकल्या आहेत. त्यामुळेच आता जनतेला तोंड देणे तुम्हाला कठीण जात आहे आणि तीच गोष्ट तुम्हाला त्रास देत आहे.
..हे वृत्त आम्ही अपडेट करत आहोत
पंतप्रधान अन् गृहमंत्री हरवले:मोदी-शहांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, ते संसदेत यायला घाबरतात का?, संजय राऊतांचा सवाल
