Pune Traffic Rule Violators To Get Auto Challans; ITMS Project Nears Finish

0
371523bb-aa9b-4954-bf5b-0c4c3d5bb198_1776597773014.jpg



पुणे शहरात वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी राबवण्यात येत असलेला इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) प्रकल्प अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या प्रणालीमुळे वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना आता स्वयंचलित पद्धतीने चलन (ई-चलन) जारी केले जाईल, अशी माहि

.

पाटील हे सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे (SEAP) तर्फे हॉटेल शेरेटन ग्रँड येथे आयोजित ‘पुणे सोशल इम्पॅक्ट डायलॉग’ कार्यक्रमात बोलत होते. यावेळी ग्लोबल सस्टेनिबिलिटी इम्पॅक्ट कोच किरण डी. एम., पिनॅकल इंडस्ट्रीजचे डॉ. सुधीर मेहता, क्लायमट ट्रूपर्स फाउंडेशनचे सत्या नटराजन, सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे प्रो. राजीव येरवडेकर, SEAP चे अध्यक्ष शिवराज साबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कॉर्पोरेट संस्थांना त्यांच्या सीएसआर (CSR) निधीचा प्रभावीपणे वापर करता यावा आणि तो योग्य संस्थांपर्यंत पोहोचून समाजोपयोगी कामे व्हावीत, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पाटील यांनी पुणे शहरातील वाढत्या वाहतूक समस्येवर प्रकाश टाकला. १९९५ मध्ये ८६ चौरस किलोमीटर असलेले पुणे शहर २०२५ पर्यंत ३७३ चौरस किलोमीटरपर्यंत वाढले आहे, म्हणजेच ३३२ टक्क्यांची वाढ झाली आहे. वाहनांच्या वेगाच्या मर्यादेत पुणे जागतिक पातळीवर पाचव्या क्रमांकावर आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणाऱ्यांचे प्रमाण केवळ ११ टक्के आहे. २०१२ मध्ये पीएमपीएमएल बससेवेचा वापर करणारे १२ लाख प्रवासी होते, हा आकडा आजही बदललेला नाही. सध्या मेट्रोचा वापर करणारे सुमारे तीन लाख लोक आहेत, तर खासगी वाहनांची संख्या ७८ लाखांपर्यंत पोहोचली आहे.

पुणे शहराची वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे. यामध्ये ट्रॅफिक आणि ट्रान्सपोर्ट इंजिनिअरिंगची विशेष टीम तयार केली जाईल. तसेच, इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (ITMS) आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून वाहतुकीला शिस्त लावण्यात येणार आहे. ITMS च्या अंमलबजावणीमुळे वाहतूक नियम मोडणाऱ्यांना स्वयंचलित चलन मिळेल, ज्यामुळे वाहतूक पोलिसांवरील कामाचा ताण कमी होईल. शहरातील ३२ महत्त्वाचे रस्ते निश्चित करून त्यावर काम सुरू झाले आहे, ज्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या कमी होण्यास मदत होईल, असेही पाटील यांनी सांगितले.

पाटील पुढे म्हणाले की, “वाहतुकीचे नियम तोडल्यामुळेच शहरात अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी मॅपमाय इंडिया, गुगल, टॉमटॉम यांची मदत आम्ही घेत आहोत. शहरांमध्ये नव्याने विकसित होत असणारे रस्ते, उड्डाणपूल यांची उभारणी करण्याआधी योग्य ती माहिती घेऊन काम करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम करण्याच्या दृष्टीने सरकारने सकारात्मक पावले उचलली आहेत. पुढल्या पाच वर्षांत पुण्यामध्ये १२० किलोमीटरचे मेट्रोचे जाळे तयार होईल. नागरिकांनी देखील सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याची गरज आहे.”

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enable Notifications OK No thanks