महिला रुग्णाशी अश्लील वर्तन करणारा मनपाचा डॉक्टर पळाला:कारवाईकडे लक्ष, उद्या सेवा खंडितचे आदेश निघणार

0
orig_new-project-86_1771475862.jpg




महापालिकेच्या दवाखान्यात एका डॉक्टराने महिला रुग्णासोबत आक्षेपार्ह वर्तन केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. या कारणावरून दवाखान्यात खूपच गोंधळ झाला. यानंतरही प्रशासनाने संबंधित डॉक्टरवर कारवाई केली नाही. हे प्रकरण अंगलट येत असल्याचे लक्षात येताच बुधवारी या डॉक्टरने रजा टाकून पोबारा केला. आरोग्य विभागाने त्याला फक्त नोटीस बजावली आहे. त्यातही आक्षेपार्ह वर्तनाऐवजी फक्त पूर्व सूचना न देता रजेवर गेल्याचे कारण दिले आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती घेऊन शुक्रवारपर्यंत या डॉक्टराची सेवा समाप्त करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिली. अनेक महिला रुग्णांसोबत सहा ते सात महिन्यांपासून हा डॉक्टर आक्षेपार्ह वर्तन करत होता.एका पीडितेने परिचारिकेला याबाबत माहिती दिली. त्यांनी आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांच्या कानावर हा गंभीर प्रकार घातला. या दवाखान्यातच तो रहायला होता. वरिष्ठांकडे तक्रार गेल्याचे कळताच खोलीला कुलूप लावून तो गावी घरी निघून गेला.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks