Drugs Free Maharashtra Campaign; Anti-Drug Committees In Schools & Colleges


राज्यातील विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यातून दूर ठेवण्यासाठी आणि व्यसनमुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत राबविण्यात येणाऱ्या ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचा विस्तार आता संपूर्ण महाराष्ट्

.

नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष तथा कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशात अंमली पदार्थांविरुद्ध एक मोठा लढा उभारण्यात आला आहे. याच लढ्याला महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली अधिक बळ मिळत आहे. ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचे मॉडेल आता संपूर्ण राज्यात राबविण्यात येणार आहे. मुंबईसह राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ‘नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती’ची स्थापना होणार आहे. माझ्या निवेदनाची दखल घेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.”

विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती, समुपदेशनावर भर

शाळा आणि महाविद्यालयांत स्थापन होणाऱ्या समित्यांमार्फत विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी सातत्याने जनजागृती केली जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल वेळेत ओळखून त्यांना समुपदेशन उपलब्ध करून देणे, पालक आणि शिक्षकांमध्ये समन्वय राखणे तसेच गरज भासल्यास तज्ज्ञांकडे मार्गदर्शनासाठी पाठविण्याची जबाबदारीही या समित्यांवर असेल.

२०२९ पर्यंत अंमली पदार्थमुक्त भारताचे लक्ष्य

केंद्र सरकारने २०२९ पर्यंत देश अंमली पदार्थमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून, त्यासाठी विविध विभागांच्या समन्वयातून प्रतिबंधात्मक कारवाई आणि व्यापक जनजागृती मोहीम राबविली जात आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनानेही राज्यातील व्यसनमुक्ती अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत.

३० जुलैला ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३० जुलै रोजी वरळी डोम येथे ‘ड्रग्स फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ होणार आहे. हा केवळ उद्घाटनाचा कार्यक्रम नसून वर्षभर चालणारी व्यापक जनचळवळ असणार आहे. या अभियानात विद्यार्थी, शिक्षक, पालक, स्वयंसेवी संस्था, मानसोपचारतज्ज्ञ, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), राष्ट्रीय छात्र सेना (NCC) तसेच समाजातील विविध घटकांचा सहभाग राहणार आहे.

वर्षभर जनजागृतीचे विविध उपक्रम

या अभियानांतर्गत शाळा आणि महाविद्यालयांमध्ये वर्षभर व्यसनमुक्तीविषयी जनजागृती कार्यक्रम, मार्गदर्शन सत्रे, समुपदेशन उपक्रम आणि संवादात्मक कार्यशाळा आयोजित केल्या जाणार आहेत. समाजातील प्रत्येक घटकाने या मोहिमेत सहभागी होऊन व्यसनमुक्त महाराष्ट्र घडविण्यास हातभार लावावा, असे आवाहन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले.

हे ही वाचा…

नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेणार:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे गृह विभागाला निर्देश, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

‘नीट’ परीक्षा पेपरफुटीप्रकरणी कॉकरोज जनता पार्टी आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या तीव्र आंदोलनानंतर शिक्षणमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. या आंदोलनाच्या काळात महाराष्ट्रासह देशभरात विविध ठिकाणी विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कारवाई करत गुन्हे दाखल केले होते. मात्र, दिल्लीतील आंदोलनाच्या धर्तीवर महाराष्ट्रात झालेल्या नीट आंदोलक विद्यार्थ्यांवरील किरकोळ गुन्हे मागे घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाला दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजारो आंदोलक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सविस्तर वाचा…

सरकारची दोन लाखांची कर्जमाफी कागदावरच?:1.54 लाखांच्या कर्जावर अवघी 94 हजारांची माफी, धाराशिवमध्ये शेतकरी संतप्त

राज्य शासनाने दोन लाख रुपयांपर्यंतच्या शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात जमिनीवर या योजनेच्या अंमलबजावणीत मोठा गोंधळ सुरू असल्याचा दावा धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केला आहे. तुळजापूर तालुक्यातील गंधोरा गावात कर्जमाफीच्या यादीतील तफावतीमुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. 1.54 लाखांच्या कर्जावर अवघी 94 हजारांची माफी देण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दोन लाखांपर्यंतच्या कर्जाची थकबाकी असतानाही प्रत्यक्ष यादीत अत्यंत कमी रक्कम माफ झाल्याचे दिसून येत असल्याने, “ही कर्जमाफी म्हणजे निव्वळ जुमला आहे,” असा घणाघाती आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सविस्तर वाचा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *