डॉ.व्यंकटेश काबदे यांना जीवनगौरव पुरस्कार तर विजय दादा सोनवणे व प्रा. डॉ.अशोक सिद्धेवाड यांना कार्यकर्ता गौरव पुरस्कार

0
2e5376b6-25dc-475d-bcaa-a4a88a2183a5.jpg


सदाबहार फाउंडेशन चे पुरस्कार जाहीर
नांदेड-  येथील समाजवादी विचारा धीष्टीत जीवन जगलेले लोकशाही समाजवादी नेते कै.सदाशिवराव पाटील यांच्या स्मृतिप्रित्यर्थ  स्थापित ‘ सदाबहार फाउंडेशन ‘ च्या वतीने दरवर्षी जीवन गौरव आणि कार्यकर्ता गौरव पुरस्कार दिले जातात. 2025- 26 या वर्षातील जीवनगौरव पुरस्कार हा माजी खासदार नांदेड एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आणि जेष्ठ हृदयरोग तज्ञ डॉ. व्यंकटेश काबदे यांना जाहीर झाला आहे. तर यावर्षी सदाशिवराव पाटील स्मृती कार्यकर्ता गौरव पुरस्कार आर.पी.आय. चे राज्य संघटक, दैनिक रिपब्लिकन गार्डचे संपादक , महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार प्राप्त श्री विजय दादा सोनवणे यांना तसेच अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, ग्रंथालय चळवळ व म. ज. वि. प.यासारख्या चळवळीत असलेले( कै). दत्ता चौगुले स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्रा. डॉ. अशोक सिद्धेवाड यांना जाहीर झाला आहे. 3 मार्च नंतर होणाऱ्या एका विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात येईल अशी माहिती सदाबहार फाउंडेशनचे संस्थापक सीए डॉ. प्रवीण पाटील, प्रा. डॉ. बालाजी कोम्पलवार, प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे ,श्री गणेश पाटील डोणगावकर, डॉ. विशाल पतंगे आणि डॉ. राजेश सोनकांबळे यांनी कळविले आहे.

Post Views: 204






वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks