छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त नांदेड येथे १७ व १८ फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन


कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

नांदेड – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, आदर्श, स्वराज्य संकल्पना आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यांचे दर्शन घडविणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम 17 व 18 फेब्रुवारी 2026 रोजी डॉ. शंकरराव चव्हाण सभागृह येथे आयोजित करण्यात येणार आहेत.

कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :

17 फेब्रुवारी 2026

सायंकाळी 6 ते 7 प्रसिद्ध अभ्यासक व पुरातत्त्व संशोधक केतन पुरी यांचे व्याख्यान. सायंकाळी 7 ते 9 शाहिर प्रा. डॉ. शिंदे व प्रा. डॉ. मुरलीधर हंबर्डे व संच यांचा शाहीरी जलसा.

18 फेब्रुवारी 2026

सायंकाळी 6 ते 8 मुक्ताई प्रतिष्ठान, देगलूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम.

हा कार्यक्रम सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, युवक-युवती, महिला तसेच सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या प्रतिनिधींसाठी खुला आहे.जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, त्यांचा पराक्रम व प्रेरणादायी जीवन नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे.

Post Views: 150






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Enable Notifications OK No thanks