![]()
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत खलनायक असणाऱ्या टिपू सुलतानची तुलना केली. त्याबद्दल संजय राऊत यांनी चकार शब्द सुद्धा काढला नाही. साधा निषेध सुद्धा करण्याची हिंमत संजय राऊत यांनी दाखवली नाही, कारण त्यांना राज्यसभेची खासदारकी मिळवायची आहे. त्यासाठी राहुल गांधीची चाटूगिरी करण्याचा प्रयत्न राऊतांकडून सुरू आहे, असे भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे. नवनाथ बन म्हणाले की, संजय राऊतांमध्ये काँग्रेस,सपकाळ यांचा निषेध करण्याची हिंमत नाही, कारण काँग्रेसच्या आशीर्वादाने त्यांना राज्यसभेची खासदारकी पाहिजे आहे. तर उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेची आमदारकी काँग्रेसच्या आशीर्वादाने पाहिजे म्हणून ते खलनायक टिपू सुलतानाचा निषेध करण्याची धमक त्यांच्यामध्ये नाही. राऊत हिंदूत्व आणि बाळासाहेब ठाकरेंचे थोडे विचार तुमच्यात शिल्लक असतील तर सपकाळांना नाक घासून माफी मागायला लावा. तुम्ही कितीही चाटूगिरी केली उद्धव ठाकरेंना आमदारकी आणि तुम्हाला राज्यसभा काँग्रेसकडून मिळणार नाही. फार्महाऊसची चौकशी झाली तर भाषणं बंद पडतील! नवनाथ बन म्हणाले की, जनाब संजय राऊत जर सजग असते तर निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले नसते. ही कार्यकर्त्यांची निवडणूक होती, कार्यकर्ते लढत होते आणि उद्धव ठाकरे आणि राऊत घरात बसलेले होते. त्यांनी मैदानावर उतरत कार्यकर्त्यांसाठी लढायला पाहिजे होते. ते सोडून तुम्ही घरात बसले होते आणि आता म्हणता सजग होतो. अलिबागमधील किती सातबारे संजय राऊत यांनी शेतकऱ्यांना फसवून तुम्ही तुमच्या नावावर केले? तुम्ही शेतकऱ्यांच्या जमीनी लोकांना विकल्या? तिथे फार्म हाऊस बांधले हे लोकांना माहिती आहे हे राऊतांनी लक्षात ठेवावे. राहुल नार्वेकर यांनी दोन शेतकऱ्यांचे केवळ भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही नवनाथ बन म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांना राष्ट्रभक्ती राऊतांनी शिकवू नये. जनता त्यांच्यामागे आहे. राऊत पाकिस्तानची प्रवक्तेगिरी आणि चाटोगिरी करतात हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला अन् तुमच्या पक्षाला जनतेने घरी बसवले आहे. असेच केले तर तुमच्या पक्षाची अवस्था याहून अतिशय वाईट होईल. तुम्ही पाकिस्तानचा जो जय जय कार करतात म्हणून लोकांनी तुम्हाला नाकारले आहे. जनतेला देवाभाऊ राष्ट्रभक्त आहेत हे माहिती असल्याने जनता त्यांच्यासोबत आहे. राऊतांनी आधी काँग्रेसशी फारकत घ्यावी नवनाथ बन म्हणाले की, टिपू सुलतान पाकिस्तानमध्ये नायक तर भारतामध्ये खलनायक आहे. पाकिस्तानमध्ये त्याचा उदोउदो करतात त्यांचाच राहुल गांधीची काँग्रेस उदोउदो करते, सपकाळ शिवरायांशी त्याची तुलना करतात. राऊत तुम्ही त्याच काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसला आहात. तुम्ही आधी काँग्रेसची फारकत घ्या. त्यांच्या पार्श्वभागावर लात मारत त्यांना दूर करा आणि सांगा की टिपू सुलतानचा उदोउदो केला तर आम्ही तुमच्यासोबत राहणार नाही. जय शहा यांच्यावर टीका करण्याची राऊतांची लायकी नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाला, पण काँग्रेसकडून राज्यसभेसाठी राऊत गप्प:हिंदुत्व शिल्लक असेल तर हर्षवर्धन सपकाळांचा निषेध करा- नवनाथ बन
