आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्या दगडवाडीत भाजपाची संवाद बैठक; मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे करणार मार्गदर्शन, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधणार संवाद.
तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांची माहिती.
(प्रतिनिधी) आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक बांधणीवर भर दिला आहे. याच अनुषंगाने हदगाव पूर्व मंडळातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी आणि मार्गदर्शनासाठी उद्या शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी दगडवाडी येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत भाजपाचे मराठवाडा संघटनमंत्री संजयभाऊ कौडगे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी दिली आहे.
दगडवाडी (ता. हदगाव) येथील भगवती फार्म येथे दुपारी ३ वाजता ही बैठक संपन्न होणार आहे. या संवाद बैठकीच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे उत्तर जिल्हाध्यक्ष ॲड. किशोर देशमुख हे राहणार आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि पक्षाचे आगामी उपक्रम यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा होणार आहे. संघटनात्मक रचना मजबूत करण्यासाठी मंडळाचे सरचिटणीस, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकारिणीचे पदाधिकारी, तसेच पूर्व मंडळातील सर्व मोर्चा, सेल, आणि आघाडीचे संयोजक व अध्यक्ष यांना निमंत्रित करण्यात आले आहे.यासोबतच तळागाळातील संघटन मजबूत करण्यासाठी शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथप्रमुख यांनाही संजयभाऊ कौडगे हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या महत्त्वपूर्ण बैठकीसाठी तालुक्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर, पश्चिम मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत हानवते आणि शहर मंडळाचे अध्यक्ष बाला पाटील यांनी केले आहे.
