गुणवत्तापूर्ण रोपांचा विश्वास… शेतकऱ्यांच्या प्रगतीचा ध्यास!
कृषिरत्न हायटेक नर्सरीच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे शितल पाटील..!!
वाढदिवसाच्या अभिष्टचिंतनानिमित्त विशेष लेख
जीवेत् शरदः शतम्…!
शेतीच्या यशस्वी वाटचालीत दर्जेदार रोपे, उत्तम बियाणे आणि योग्य मार्गदर्शन यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी, त्यांना लागवडीसाठी गुणवत्तापूर्ण साहित्य उपलब्ध व्हावे आणि बदलत्या कृषी तंत्रज्ञानाचा लाभ घेता यावा, या उद्देशाने कार्य करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे कृषिरत्न हायटेक नर्सरी, घुंगराळा येथील संचालक श्री. शितल शिवाजी पाटील!
शिक्षण, नियोजन आणि उद्योजकीय दृष्टिकोन
बी.एस्सी. अॅग्रीकल्चर आणि एमबीए-एबीएम असे कृषी व व्यवस्थापन क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या शितल पाटील यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग रोपवाटिका व्यवसायाच्या विस्तारासाठी केला. अवघ्या काही गुंठ्यांपासून सुरू झालेल्या कृषिरत्न हायटेक नर्सरीचा आज पाच एकर क्षेत्रापर्यंत झालेला विस्तार त्यांच्या जिद्दीचा, नियोजनाचा आणि व्यवसायाप्रती असलेल्या बांधिलकीचा परिचय करून देतो.
नांदेड जिल्ह्यापासून सुरू झालेली ही सेवा आज संपूर्ण मराठवाड्यासह तेलंगणा, मध्य प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक राज्यांतील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. गुणवत्तापूर्ण रोपे उपलब्ध करून देतानाच शेतकऱ्यांशी विश्वासाचे नाते जपणे, ही त्यांच्या व्यवसायाची महत्त्वाची ओळख आहे.

शेतकऱ्यांना दर्जेदार रोपे आणि आधुनिक मार्गदर्शन
टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, वांगी, झेंडू, मिरची, कलिंगड, ऊस, पपई यांसह विविध पिकांची रोपे कृषिरत्न हायटेक नर्सरीच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जातात. हंगामानुसार योग्य रोपांची निवड, लागवडीचे नियोजन आणि पीक व्यवस्थापन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यावर शितल पाटील यांचा भर असतो. दर्जेदार रोपे व बियाणे उपलब्ध करून देण्यासोबतच आधुनिक लागवड तंत्रज्ञानाची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्यही ते करतात.
केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी टिश्यू कल्चर रोपांची उपलब्धता आणि बुकिंगची सुविधा हा त्यांच्या व्यवसायातील महत्त्वाचा उपक्रम आहे. फळे व भाजीपाला उत्पादकांसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक रोपवाटिका तंत्रज्ञान आणि लागवडीच्या नव्या पद्धती समजून घेण्याची संधी मिळते.
व्यवसायातील पारदर्शकता, गुणवत्तेला दिलेले प्राधान्य आणि शेतकऱ्यांच्या गरजा समजून घेण्याची वृत्ती यांमुळे कृषिरत्न हायटेक नर्सरीने कृषी क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. या वाटचालीत पत्नी सौ. रत्नमाला पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांच्या कार्याची दखल दैनिक उद्याचा मराठवाडा आयोजित ‘प्राईड ऑफ मराठवाडा’ गौरव उपक्रमात घेण्यात आली आहे.

वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!
श्री. शितल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि उद्योजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! त्यांच्या मार्गदर्शनातून अधिकाधिक शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण कृषी साहित्याचा लाभ मिळो, कृषिरत्न हायटेक नर्सरीचा विस्तार होवो आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीतील त्यांचे योगदान अधिक समृद्ध होवो, हीच सदिच्छा!
संपर्क पत्ता :
कृषिरत्न हायटेक नर्सरी, घुंगराळा
संचालक : श्री. शितल शिवाजी पाटील
पत्ता : नांदेड–नरसी मार्ग, बसस्थानकाच्या बाजूला, घुंगराळा, ता. नायगाव (बा.), जि. नांदेड.
उपलब्ध सुविधा : विविध भाजीपाला व फळपिकांची दर्जेदार रोपे, बियाणे आणि आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन.
संपर्क : ९८२३६०५०५४ / ९४०४६९०६५४
वाढदिवसानिमित्ताने खूप खूप सदिच्छा…!
– मारोती सवंडकर,
दैनिक उद्याचा मराठवाडा परिवार, नांदेड
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad