मोबाईल शॉपी फोडली – VastavNEWSLive.com


नांदेड(प्रतिनिधी)-कंधार शहरात एक मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी 1 लाख 55 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे.
अंकुश दत्तात्रय पेठेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 4 फेबु्रवारी रोजी मध्यरात्री 3 ते 3.40 या वेळेत कंधारमधील त्यांच्या मालकीची वरद मोबाईल शॉपी अनोळखी तिन इस्मांनी दुकानाचे शटर वाकवून फोडली. तसेच त्या दुकानातील मोबाईल फोन, पावर बॅंक, चार्जर व काही इलेक्ट्रॉनिक साहित्य असा एकूण 1 लाख 55 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी कंधार पोलीसांनी गुन्हा क्रमांक 35/2026 दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक स्नेहा पिंपरखेडे अधिक तपास करीत आहेत.

Post Views: 172






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *