परळीचे खरखट गप्प बसणार नाही:अमोल खुणेच्या आरोपांवर मनोज जरांगेंचा पलटवार, म्हणाले- आता सुट्टी नाही

0
copy-of-db-temp-cover-marathi-19_1770300622.jpg




मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची नार्को टेस्ट तसेच एसआयटी चौकशी करावी, अशी मागणी जरांगे यांच्या घातपाताचा आरोप असलेल्या अमोल खुणे यांनी केली आहे. अमोल खुणे हे जरांगेंचे जुने सहकारी देखील होते. या मागणीचे निवेदन त्यांनी पोलिस अधीक्षकांना दिले असून अमोल खुणे यांनी मनोज जरांगे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अमोल खुणेच्या अर्जाची अंमलबजावणी करा. दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या, असे जरांगे म्हणाले आहेत. मनोज जरांगे पाटील म्हणाले, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या. परळीचे खरखट गप्प बसणार नाही. जामीन झाले की पुन्हा पुन्हा तो कट रचणार, असे म्हणत जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला. हे सगळे घडवून आणतो तो धन्याच आहे. तसेच अमोल खुणेच्या मागणीवर बोलताना जरांगे म्हणाले, तू धुतल्या तांदळाचा होता तर तू म्हणायला पाहिजे होते की धन्यासहीत नार्को टेस्ट करा. खुणेच्या आईने आणि पत्नीने सांगितले होते की तो पितोय. हे पोरगं असा आहे की स्वतः सुखाने खायचे नाही घरच्याला सुखाने तुकडे खाऊ द्यायचे नाही. याला कोणीतरी फुस लावेल म्हणून मी एसपींना सांगितले. तुला कोणी सांगितले गेले का किंवा याने इसार घेतला होता का? असा सवाल जरांगे यांनी केला आहे. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, झालेले आरोप सिद्ध करावे लागतील नाहीतर पुढच्या काळात फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत, आता सुट्टी नाही. आंदोलनाचे जे आरोप करायचे आहे त्याचे तुला पुरावे द्यावे लागतील नाहीतर फौजदारी गुन्हे दाखल होतील. तुझं पुढे बघ आता काय काय होतं तू फक्त नीट राहू नकोस इथून पुढे, असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. तसेच दुसऱ्या जातीच्या लोकांना खुश करण्यासाठी तू आपल्या जातीला डाग लावतो का? असा सवालही जरांगे यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed