रोहित पवारांचे आंदोलन विद्यार्थ्यांसाठी नसून राजकीय नौटंकी:कर्जत-जामखेडमधून पराभव निश्चित, म्हणूनच पुण्यावर किंवा बारामतीवर डोळा- नवनाथ बन

महाराष्ट्र




आमदार रोहित पवार पुण्यामध्ये विद्यार्थ्यांच्या नावाखाली केवळ राजकीय स्टंट करत असल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. पुण्यामध्ये सुरू असलेले हे आंदोलन विद्यार्थ्यांच्या हितासाठी नसून पूर्णपणे एक राजकीय कार्यक्रम आणि ‘राजकीय नौटंकी’ आहे. या आंदोलनाशी विद्यार्थ्यांचे काहीही देणेघेणे नसून, यात केवळ 20 टक्केच विद्यार्थ्यांचा सहभाग आहे, तर उरलेल्या 80 टक्क्यांमध्ये राजकीय लोकांची मोठी घुसखोरी आहे. नवनाथ बन म्हणाले की, रोहित पवार आता कर्जत-जामखेडमधून निवडणूक लढणार नाहीत, तिथे त्यांचा पराभव होईल. कदाचित पुण्यातील एखाद्या मतदारसंघावर रोहित पवारांचा डोळा असेल किंवा बारामती मतदारसंघावर डोळा असेल. तिथे आपला मतदारसंघ तसार करण्यासाठी रोहित पवारांनी पुण्यात केंद्र निवडले आहे. आंदोलनात विद्यार्थी नाही, कंपन्याचे कर्मचारी नवनाथ बन म्हणाले की, पुण्यात सुरू असलेल्या रोहित पवारांच्या आंदोलनात खरे विद्यार्थी नाहीत, तर थेट ‘बारामती ॲग्रो’ कंपनीचे, कारखान्याचे कर्मचारी तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे काही कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. रोहित पवारांच्या या आंदोलनाकडे एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. आंदोलन यशस्वी होत नसल्याने आणि पहिले चार दिवस तिकडे कोणी फिरकले नसल्याने, रोहित पवारांनी नंतर नौटंकी करत फोन करून कंपन्या व साखर कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना पुण्यात बोलावून घेतले. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळू नये नवनाथ बन म्हणाले की, आंदोलनासाठी पुण्याबाहेरून लोक आणण्यात आली असून तब्बल 200 ते 250 गाड्यांच्या माध्यमातून बाहेरून माणसे बोलवल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत.राजकीय फायद्यासाठी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी असे खेळू नये, असा कडक इशाराही त्यांनी यावेळी दिला. रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांचा विरोध नवनाथ बन म्हणाले की, काल रात्री आंदोलन स्थळी जी गर्दी जमली होती ती गर्दी रोहित पवारांनी पैसे देऊन जमा केली होती. संजय राऊत, रोहित पवार आणि विजय वडेट्टीवार यांचे भाषणं झाली. त्यानंतर खासदार ओम राजेनिंबाळकर यांचे भाषण सुरू झाले त्यावेळी परत जा घोषणा करणारे विद्यार्थ्यी नाही तर रोहित पवारांचे कार्यकर्ते होते. हे आंदोलन यशस्वी होत नाही म्हणून गर्दी जमवण्याचा प्रयत्न केला गेला. हे ही वृत्त वाचा फडणवीसांचे राजकारण ओहोटीला लागले:शहा इतके घाबरलेत की दिल्लीत घरासमोर सैन्य तैनात, सत्ताधाऱ्यांचा मेंदू ब्रिटिशांसारखा हललाय- संजय राऊत
देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाला उतरती कळा लागलेली दिसते. आम्ही त्यांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याला दिल्लीत जाणार आहात तिथे आपले स्थान आहे.तर ते स्वत:च्या हाताने स्वत:चे नुकसान करुण घेत आहेत. कालचा मोर्च्यात हजारो लोकं एकत्र येत ज्ञानेश कुमार यांच्या राजीनामा झाला पाहिजे अशी मागणी केली, हे काही रडगाणं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जे करतात त्याला रडगाणं म्हणतात, असे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *