‘आयआयबी इन्स्टिट्यूट’चा गौरव सोहळा जल्लोषात साजरा

‘आयआयबी इन्स्टिट्यूट’चा गौरव सोहळा जल्लोषात साजरा

निश्चित ध्येय व सातत्यपूर्ण प्रयत्न हाच यशाचा पासवर्ड – प्रा. नितीन बानुगडे पाटील

आयआयबी इन्स्टिट्यूटचा वार्षिक गौरव सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. नीट, आयआयटी-जेईई व सीईटी परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी त्यांच्या पालकांसह गौरव करण्यात आला. “जल्लोष विजयाचा – १००% ओरिजिनल निकालाचा” या घोषवाक्याखाली हा सोहळा पार पडला.

आयआयबी गौरव सोहळा व आयआयबी इन्स्पायर असा संयुक्त कार्यक्रम हजारो विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व प्रबोधनकार प्रा. नितीन बानुगडे पाटील प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. निश्चित ध्येय निश्चित करून त्या दिशेने सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. विद्यार्थ्यांनी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून संघर्षांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, तसेच पालकांनीही विद्यार्थ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले. अनेक प्रेरणादायी उदाहरणांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भरकटून न जाता सातत्याने अभ्यास करण्याचा सल्ला त्यांनी दिला.

आयआयबी इन्स्टिट्यूटने सामाजिक बांधिलकी जपत किनवट तालुक्यातील आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना नीट परीक्षेच्या तयारीसाठी दत्तक घेतले होते. या उपक्रमाची माहिती देताना जिल्हा परिषद नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी आयआयबीच्या कार्याचे कौतुक केले.

नीट २०२५ च्या निकालात आयआयबी इन्स्टिट्यूटने आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. श्रेयस डमके (६१३), बोदडे स्वरूप (६११), केंद्रे अपूर्वा (६०६), भेंडकर कार्तिक (६०४), प्रियांशु मनोहर (५९६), खाकरे हर्षद (५९४), मुटकुळे शिवम (५९१), गांधी आयुष (५८९), वाघमारे मकरंद (५८३), शेख हुजेफ (५७९), कोकणे क्षिती (५७८), खर्चे रोहन (५७८), उंबरेकर यश (५७७) व चव्हाण मयांक (५७५) यांनी उल्लेखनीय गुण मिळवले.

इंजिनिअरिंगच्या निकालातही आयआयबी इन्स्टिट्यूटने भरीव यश संपादन केले आहे. शुभ्रा कदम, विश्ववरद कांबळे व निहाल जाधव यांनी आयआयटी अडव्हान्स्ड परीक्षेत यश मिळवले आहे. सीईटी पीसीएम गटातून ९९ पेक्षा अधिक परसेंटाइल मिळवणारे ७ विद्यार्थी असून त्यामध्ये चव्हाण स्वरूप (९९.४२), सरपोतदार समीरा (९९.४२), कासले समीक्षा (९९.३९), पाटील प्रज्वल (९९.३१), कदम प्रीती (९९.२९), कुंभार सिद्धी (९९.१०) व चव्हाण स्वप्नील (९९.०७) यांचा समावेश आहे. याशिवाय १३२ विद्यार्थ्यांनी ९० पेक्षा अधिक परसेंटाइल मिळवले आहेत.

दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी यशस्वी विद्यार्थ्यांचा मेघना कावली व टीम आयआयबीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यामध्ये मनीषा विजय वालके (एमबीबीएस – लातूर), रेखा अर्जुन कण्णके (एमबीबीएस – पीडीएमसी, अमरावती), शिल्पा सत्यव्रत गरुळे (एमबीबीएस – जीएमसी, यवतमाळ), शोभा सुदर्शन डावरे (बीएएमएस – कोल्हापूर) व रेश्मा वैजनाथ डुकरे (बीएएमएस – छत्रपती संभाजीनगर) यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *