![]()
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी रंगात आली असून, उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर प्रत्यक्ष लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. या महत्त्वपूर्ण टप्प्यावर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, राज्याचे
.
यावेळी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पंधराशे रुपये लाडक्या बहिणींना देतो त्याच्या अनेक सक्सेस स्टोरी आहेत. आता, 1500 रुपयांचे 2100 रुपये योग्यवेळी करणार हा शब्द लाडक्या बहिणींना दिलेला आम्ही पाळणार आहोत. पुढे ते म्हणाले, अडीच वर्षात माझे काम तुम्ही पाहिले आहे. मी अडीच वर्षात अडीच तास शांत झोपलो नसेल. लाडक्या बहीणींनी ठरवले होते, लाडक्या भावाला निवडून आणायचे, असे म्हणत त्यांनी 2100 रुपये योग्य वेळी करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, लाडकी बहीण योजनेसाठी 45 हजार कोटी एका वर्षाचा खर्च होता, भल्याभल्यांची हिम्मत झाली नाही. मात्र, जे खोडा घालायचे त्यांना 232 नंबरचा घोडा दाखवला. महारष्ट्राच्या इतिहासात 232 जागा महायुतीच्या कधी निवडून आल्या नव्हत्या. तसेच, माझ्या आईची काटकसर आणि माझ्या पत्नीच्या डोळ्यातील अश्रू पहिले होते, म्हणून मी याचा विचार करुन महिलांसाठी लाडकी बहीण योजना आणली असल्याचे शिंदे यांनी यावेळी अधोरेखित केले.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, माझी कर्मभूमी मुंबई असली तर माझी जन्म भूमी सातारा आहे, सातारा जिल्ह्याची गौरवशाली परंपरा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आपण कारभार करतोय. संपत्ती कमावली यापेक्षा माणसं किती कमवली हे मी पाहिले. आधीच्या मुख्यमंत्र्यांना स्पीड ब्रेकर आणि स्थगितीशिवाय काही माहित नव्हते. फेसबुक लाईव्ह नाही तर फेस टू फेस काम कराव लागते, असे म्हणत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
उद्धव ठाकरेंवर टीका
मी मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्या स्थगित्या उठवल्या, कोकण ते पश्चिचम महाराष्ट्र जवळ आणण्याचे काम सुरु झाले. साडेतीन वर्षे झाले आम्ही उठाव केला, झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला शिवसेनाच या भूमीचा आणि लेकरांचा विचार आणि प्रगती करू शकते. गेला तो चोर आणि कचरा असे किती दिवस बोलणार? आमच्या सोबत ते का आले? याचा विचार करा, असा सल्लाही ठाकरेंना दिला.
शिवसेनेचा अजेंडाच विकास आहे, शिवसेना ठाण्यापर्यंत मर्यादित आहे म्हणत होते. मात्र, शिवसेना चांदा ते बांदा पसरलीय, दगडू दादांचे अभिनंदन करतो त्यांनी एवढी वर्षे दिली. दगडू दादांनी शिवसेनेसाठी केलेल्या कामाचे चीज करायला पाहिजे होते. पण, त्यांनी केले नाही. दगडू दादांनी आणि मी सुद्धा स्वाभिमान दाखवला. या मातीत स्वाभिमान आणि राष्ट्रभक्ती आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी माजी आमदार दगडू सपकाळ यांचे कौतुक केले.
22 गावांचे पालकत्व मी स्वीकारतोय
साताराच्या पर्यटनाविषयी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, पर्यटन सुरक्षा दल स्थापन करणारा सातारा पहिलला जिल्हा आहे. येथील 22 गावांचे पालकत्व मी स्वीकारत असल्याचे शिंदे यांनी म्हटले. तसेच यावेळी भाषण करताना त्यांनी थेट उद्योगमंत्री उदय सामंत यानं फोन केला. यावेळी सामंत फोनवर म्हणाले, 10 हजार लोकांसाठी एक इंडस्ट्री आणायचे फायनल झाले आहे. आचार संहिता संपल्यावर याला गती मिळेल, असे सामंत यांनी यावेळी म्हटले. पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, कुणबी प्रमाणपत्र देणारा एकनाथ शिंदे आहे. लवकरात लवकर महादेव कोळी जातीच्या जात पडताळणीचे दाखले देण्याचे काम सुरू होईल, असेही यावेळी त्यांनी सांगितले.
