इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (करिअर डेव्हलपमेंट अँड रिसर्च), अहिल्यानगर येथे विद्यार्थ्यांमध्ये लैंगिक छळ प्रतिबंधाबाबत (POSH) जनजागृती व संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी विशेष सत्रांचे आयोजन करण्यात आले. सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि सर्वसमावेशक शैक्ष
.
अंतर्गत तक्रार समितीच्या प्रेसायडिंग ऑफिसर व ग्रंथपाल डॉ. स्वाती बार्नबस यांनी प्रभारी संचालक डॉ. प्रणोती तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना POSH कायदा २०१३, यूजीसी नियमावली २०१५ आणि एआयसीटीई मार्गदर्शक तत्त्वे २०१६ याबाबत माहिती दिली. लैंगिक छळाची संकल्पना, अवांछित शारीरिक, शाब्दिक, अशाब्दिक, दृश्य व ऑनलाइन वर्तन, संमती, वैयक्तिक मर्यादा, प्रतिष्ठा आणि परस्पर सन्मान याबाबत उदाहरणांसह मार्गदर्शन करण्यात आले.
अंतर्गत तक्रार समितीची रचना, कार्यपद्धती, गोपनीयता, नैसर्गिक न्यायाची तत्त्वे, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, कालमर्यादा, अंतरिम उपाययोजना आणि निष्पक्ष चौकशी याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. अयोग्य वर्तनाचे सामान्यीकरण न करता योग्य वेळी आवाज उठविण्याचे आणि गरज भासल्यास समितीकडे मदत घेण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी उपसंचालक डॉ. विक्रम बार्नबस, व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. हातिम कयूमी, आयटी विभागप्रमुख डॉ. महेश पोद्दार, बीबीए अभ्यासक्रम समन्वयक डॉ. हर्षवर्धन भावसार आणि बीसीए अभ्यासक्रम समन्वयक डॉ. मुदस्सर सय्यद यांचे सहकार्य लाभले.
सुरक्षित परिसर ही सामूहिक जबाबदारी लैंगिक छळ प्रतिबंध ही केवळ अंतर्गत तक्रार समितीची जबाबदारी नसून विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. परस्पर सन्मान, संवेदनशीलता, सहानुभूती आणि जबाबदार वर्तनातूनच सुरक्षित व सर्वसमावेशक शैक्षणिक वातावरण निर्माण होऊ शकते, असा संदेश सत्रातून देण्यात आला.आयएमएसमध्ये POSH कायद्यावर जनजागृती; हक्क, जबाबदाऱ्या व तक्रार निवारण प्रक्रियेची माहिती देण्यात आली.
