पती आणि 2 मुलांच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत असलेल्या शिक्षिकेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नांदेड शहरातील सांगवी भागातील गोपाळनगर येथे घडली. 26 सप्टेंबर रोजी त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी (28 सप्टेंबर) त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे मोरे कुटुंबावर पुन्हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 3 महिन्यांत कुटुंबातील चौघांचा मृत्यू भोकर तालुक्यातील बेंबर येथील रहिवासी असलेले सुनील मोरे हे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक होते. त्यांच्या पत्नी धम्मशिला मोरे यादेखील शिक्षिका होत्या. मोरे दाम्पत्याला सारा आणि सुमित ही 2 मुले होती. 17 जुलै 2026 रोजी सुनील मोरे यांनी मुलगी सारा आणि मुलगा सुमित यांच्यासह कारसह गोदावरी नदीपात्रात उडी घेतली होती. या घटनेत तिघांचाही मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात सुनील मोरे यांनी दोन्ही मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्या केल्याचे समोर आले होते. पती आणि मुलांच्या मृत्यूचा मोठा धक्का या घटनेनंतर धम्मशिला मोरे यांच्यावर पती आणि दोन्ही मुलांच्या मृत्यूचे मोठे संकट कोसळले होते. या घटनेचा त्यांच्यावर मानसिक परिणाम झाला होता. त्या या धक्क्यातून सावरलेल्या नव्हत्या. 26 सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे 1 वाजण्याच्या सुमारास त्यांनी सांगवीतील गोपाळनगर येथील राहत्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मृत्यू रुग्णालयात धम्मशिला मोरे यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, 2 दिवसांच्या उपचारानंतर सोमवारी 28 सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. पती आणि 2 मुलांच्या मृत्यूनंतर अवघ्या 3 महिन्यांत धम्मशिला यांचाही मृत्यू झाल्याने मोरे कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. या सलग घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. एका कुटुंबावर अवघ्या काही महिन्यांत आलेल्या या संकटाने नांदेडमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. हेही वाचा… सामूहिक अत्याचार प्रकरणात माजी आमदार नरेंद्र पवारांच्या अडचणी वाढल्या:भिवंडी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला, आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष भिवंडी तालुक्यातील सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार यांना न्यायालयाकडून धक्का बसला आहे. भिवंडी सत्र न्यायालयाने नरेंद्र पवार यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे आता पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे. या निर्णयामुळे नरेंद्र पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात नरेंद्र पवार यांच्यासह बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटील यांच्या विरोधात पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान नरेंद्र पवार यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर सत्र न्यायालयात सुनावणी झाली. सविस्तर वाचा…
पती आणि 2 मुलांच्या मृत्यूनंतर मानसिक धक्क्यात शिक्षिकेची आत्महत्या:3 महिन्यांत मोरे कुटुंबातील चौघांचा मृत्यू, परिसरात हळहळ