आरक्षण उपवर्गीकरणासाठीचा अहवाल जाहीर करण्याची परिषदेमध्ये मागणी:अनुसूचित जाती जागृती एक्स परिषदेमध्ये उमटला सूर; क्रिमिलियर हे रद्द व्हावे‎



आरक्षणाचे जनक छत्रपती राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त भारत मुक्ती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा व बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती जागृती ऐक्य परिषदेचे आयोजन प्रमिलाताई ओक ह

.

एक दिवसीय जागृती ऐक्य परिषदेत अनुसूचित जाती प्रवर्ग तयार करण्यामागील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका, आरक्षणाच्या लाभार्थी जाती समूहामध्ये अंतर्गत भांडणे लावून आरक्षणाची मूळ संकल्पना संपवण्याचे षडयंत्र, अनुसूचित जातीतील शासन-प्रशासनातील प्रतिनिधित्वातील असमानता—एक चिंतन या विषयांवर उपस्थित वक्त्यांनी तांत्रिक व शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले. लहुजी क्रांती मोर्चाचे राज्य अध्यक्ष प्रा. विकास पाथरीकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात उद्घाटक म्हणून गुरु रविदास चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणदादा घुमरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून बामसेफचे राज्य महासचिव संतोष सुरवाडे, भारत मुक्ती मोर्चाचे राज्य अध्यक्ष भागवत जाधव, भारत मुक्ती मोर्चा महिला शाखेच्या राज्य प्रभारी संध्या गवई, बुरुड समाज संघटनेचे विनायकराव पदगिरवार, बामसेफचे विभागीय सहभागी गोवर्धन गवई, बुद्धिस्ट इंटरनॅशनल महिला संघाच्या डॉ. पंचशीला मोहोड, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे राज्य संयोजक शाम अवचार, लहुजी शक्ती सेना अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ. रमेश चंदनशिव, बहुजन मुक्ती पार्टीचे चंदन वानखडे, रविदास क्रांती मोर्चाचे सुरेश उंबरकर, राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या प्रदेश उपाध्यक्ष विजया जंजाळ, बाबा मोहोड, कार्यक्रम प्रभारी संतोष सुरवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज, गुरू संत रविदास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रास्ताविक राष्ट्रीय अन्याय अत्याचार निवारण शक्तीचे विभागीय प्रभारी अॅड. सारंग निखाडे यांनी केले. त्यांनी ऐक्य परिषदेची भूमिका स्पष्ट केली. संचालन विजेंद्र वानखडे यांनी केले. आभार राजू वानखडे यांनी मानले. यावेळी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उपवर्गीकरणामुळे असंतोष अध्यक्षीय मनोगतात कार्यक्रमाचे प्रा विकास पाथरीकर यांनी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची कारण मीमांसा केली. उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती प्रवर्गात असंतोष निर्माण झाला आहे. जातीजातीत वैमानस्य निर्माण करण्याचा प्रघात सुरू झाला आहे. सरकारची सर्वप्रथम या संदर्भातील भूमिका व संकल्पना काय आहे,हे समजून घेतले पाहिजे.या आधी अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ व आताचे आर्टी यामधून किती विकास होत आहे, हे शोधले पाहिजे. यामधूनच या ज्वलंत विषयावर उत्तर मिळू शकणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विकासापासून वंचितचा डाव ऐक्य परिषदेत उद्घाटक गुरु रविदास चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणदादा घुमरे यांनी विचार मांडले. मागास जातींना विकासापासून दूर करण्याचा सरकारी डाव असल्याचे ते म्हणाले. उपवर्गीकरण हा अनुसूचित जाती प्रवर्गातील जातींचे आरक्षण कमी करण्याचा छुपा अजेडा असल्याचे अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *