सुरेश राठोड पुत्राला शिक्षा – VastavNEWSLive.com
नांदेड(प्रतिनिधी)-8 वर्षापुर्वी एका बस चालकाला मारहाण करणे संतोष सुरेश राठोडला महागात पडले आहे. आज जिल्हा न्यायाधीश कंधार यांनी मारहाण करणाऱ्याला तीन महिने कैद आणि 3 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार 8 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 9 वाजेच्यासुमारास एस.टी. चालक रामेश्र्वर विठ्ठल येरवाड हे कंधार आगाराचे एस.टी.चालक आहेत. ते आपली बस घेवून कौठा गावाजवळच्या कॅनल जवळ आले असतांना संतोष सुरेश राठोड रा.चौकी महामाया याने आपली दुचाकी गाडी एस.टी.समोर आडवी उभी करून एस.टी.चा रस्ता रोखला आणि मला साईड का दिली नाही म्हणून चालक रामेश्र्वर येरवाडला शिवीगाळ करून त्याला मारहाण केली. त्यात त्यांच्या गणवेशाचा शर्ट फाटला. रामेश्र्वर येरवाडच्या तक्रारीवरुन कंधार पोलीस ठाण्याने संतोष सुरेश राठोड विरुध्द सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणात कंधार न्यायालयाने 6 साक्षीदार तपासले. उपलब्ध असलेला तोंडी पुरावा आणि कागदोपत्री पुरावा ग्राह्य माणून कंधार न्यायालयाने संतोष सुरेश राठोडला तिन महिने कैद आणि 3 हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने ऍड. महेश कागणे यांनी काम गेले. पोलीस अंमलदार बालाजी गारोळे यांनी पैरवी अधिकाऱ्याची जबाबदारी पुर्ण केली.
Post Views: 561