परिसरात कामासाठी ओळखला जाणारा ‘अण्णा’ चर्चेत

हनुमानगड प्रभाग क्रमांक ४ मध्ये उत्सुकता वाढली

नांदेड शहरातील हनुमानगड प्रभाग क्रमांक ४ मध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. या प्रभागात सामाजिक व विकासात्मक कामांसाठी ओळखले जाणारे प्रशांत तिडके उर्फ ‘अण्णा’ यांचे नाव सध्या चर्चेत आहे.

प्रभागातील नागरिकांमध्ये अण्णांची ओळख एक स्पष्टवक्ते आणि कामासाठी तत्पर नेता अशी आहे. परिसरातील रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी ते सातत्याने पुढाकार घेताना दिसतात. कोणतेही काम असो, अण्णा ते स्वतः लक्ष घालून पूर्ण करून घेतात, अशी नागरिकांची भावना आहे.

निवडणूक जाहीर झाल्यापासून त्यांनी आपल्या समर्थकांसोबत प्रचाराला सुरुवात केली असून, घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला जात आहे. त्यांच्या साध्या, पण प्रभावी शैलीमुळे त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सांगतात की, अण्णा हे केवळ राजकारणापुरते मर्यादित नसून, गरजू लोकांना मदत करण्याची त्यांची भूमिका कायम राहिली आहे. त्यामुळेच त्यांना सर्वसामान्य मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे.

-गोविंद भोसले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *