Raj Thackeray Targets Adani BJP Releases Meeting Photos | ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस: अदाणींच्या ‘विस्तारा’वर राज ठाकरेंचा ‘लाव रे तो व्हिडिओ’, भाजपकडून ‘शिवतीर्था’वरील भेटीचे फोटो व्हायरल – Mumbai News
![]()
महाराष्ट्र नवनिर्वाचित सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्कवरील सभेत आपल्या जुन्या ‘लाव रे तो व्हिडिओ’ या शैलीत पुन्हा एकदा सरकारवर तोफ डागली. २०१४ पूर्वी देशात मर्यादित अस्तित्व असलेल्या अदाणी समूहाला भाजपच्या सत्ताकाळात मुंबई आणि महा
.
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मैदानावर एका नकाशाच्या माध्यमातून अदाणी समूहाच्या २०१४ नंतरच्या विस्ताराची ‘क्रोनोलॉजी’ मांडली. त्यांनी दावा केला की, मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ आधीच अदाणींच्या ताब्यात गेले असून वाढवण येथील प्रस्तावित विमानतळही त्यांनाच देण्याचा घाट घातला जात आहे. अदाणी समूह पूर्वी सिमेंट क्षेत्रात नव्हता, मात्र गेल्या १० वर्षांत तो देशातील दुसरा मोठा उत्पादक बनला असून सरकारी कामात त्यांचेच सिमेंट वापरले जात आहे. धारावी पुनर्विकासाच्या माध्यमातून मुंबईची मोक्याची जागा एकाच उद्योगपतीच्या घशात घातली जात असल्याचा आरोप राज यांनी केला. “मी उद्योगपतींच्या विरोधात नाही, पण एकाच व्यक्तीला अशा पद्धतीने मोठे करणे मला मान्य नाही,” असे राज ठाकरे यावेळी म्हणाले होते.
भाजपचा पलटवार: हा तर दुटप्पीपणाचा कळस
राज ठाकरेंच्या या आरोपांना भाजपने तातडीने उत्तर दिले आहे. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज ठाकरे यांच्यावर ‘ढोंगी’ आणि ‘दुटप्पी’ असल्याची टीका केली. काही वर्षांपूर्वी गौतम अदाणी स्वतः राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी गेले होते. या भेटीचे जुने फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. फोटोंमध्ये राज ठाकरेंचे कुटुंब गौतम अदाणींच्या कुटुंबासोबत असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत राज ठाकरेंनी गौतम अदाणींचा हात आपल्या हातात घेतला असून, त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करताना दिसत आहेत. अमित साटम यांनी या फोटोंवरून “ढोंगी आणि दुटप्पीपणाचा कळस” म्हणत राज ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
राजकीय चर्चेला उधाण
मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना राज ठाकरे यांनी थेट भाजपच्या धोरणांवर प्रहार केला आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे आगामी काळात ‘मनसे विरुद्ध भाजप’ असा नवा संघर्ष पाहायला मिळू शकतो.
