[ads1]
![]()
दिल्ली उच्च न्यायालयाने मेटाला निर्देश दिले आहेत की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एका महिलेचा मॉर्फ (छेडछाड केलेला) फोटो असलेला आक्षेपार्ह मजकूर तातडीने हटवावा. महिलेच्या मॉर्फ फोटोप्रकरणी उच्च न्यायालयाने म्हटले की, हे केवळ एका महिलेचे प्रकरण नाही, तर देशाच्या पंतप्रधानांशी संबंधित प्रकरण आहे. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाबाबत संवेदनशील राहावे, याची न्यायालय खात्री करेल. दिल्ली उच्च न्यायालयाने CJPचे नेते सौरव दास आणि अभिजीत दिपके यांना नोटीस बजावली आहे. त्यांनी पंतप्रधानांसोबत एका महिलेचा मॉर्फ आणि अश्लील फोटो प्रसारित केल्याचा आरोप आहे.
[ads2]
What do you feel about this post?
0%
Like
0%
Love
0%
Happy
0%
Haha
0%
Sad
0%