![]()
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संजीता महापात्र यांनी गुरुवारी अमरावती येथे शालेय क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन केले. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व, सांघिक भावना आणि चिकाटी वाढते, ज्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व घडते, असे प्रति
.
श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात आजपासून तीन दिवसीय शालेय क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सतीश मुगल होते. जिल्हा परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बालासाहेब बायस आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब रायबोले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सीईओ संजीता महापात्र यांनी यावेळी मिशन स्कॉलरशिप आणि निपुण महाराष्ट्रमध्येही यशस्वी कामगिरी करण्याचे आवाहन केले. मुलांची गुणवत्ता महाराष्ट्रात वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमादरम्यान धारणी पंचायत समितीच्या जिल्हा परिषद शाळा उकुपाटी येथील विद्यार्थिनी दुर्गा छगन कास्देकर हिचा गौरव करण्यात आला. दुर्गाने लांबउडी या वैयक्तिक खेळ प्रकारात राज्यस्तरावर अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व केले होते. यावेळी तिचे मार्गदर्शक महादेव राठोडही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी गंगाधर मोहने यांनी केले. संचालन अजय अडीकने आणि संध्या जामकर यांनी केले, तर आभार क्रीडा संयोजक प्रवीण खांडेकर यांनी मानले. यावेळी उपशिक्षणाधिकारी रजनी शिरभाते, निखिल मानकर, इम्रान खान, चांदूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ, तिवसा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. नितीन उंडे, धामणगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संदीप बोडखे, चिखलदरा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी भटेसिंग गिरासे, अंजनगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुधीर खोडे, चांदूर बाजारचे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी नंदकिशोर खरात, भातकुली पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रामेश्वर माळवे, धारणी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गुणवंत वरघट, गटशिक्षणाधिकारी विनोद गाडे, विनायक लकडे, राजेश सावरकर, शकील अहमद, श्रीनाथ वानखडे, हेमंतकुमार यावले आदी मान्यवर उपस्थित होते.
