पारंपारिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी आपल्याला दिसतात. मात्र याच पारंपारिक पद्धतीच्या शेतीपेक्षा थोडा वेगळा विचार करुन त्यासोबत नाविन्यपूर्ण संकल्पना आणि कृषी तंत्रज्ञानाची जोड देत कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील प्रगतशील शेतकरी योगेश मधुकर वक्ते यांनी डाळिंबाची बाग फुलवली आहे. बहुखोड पद्धतीला फाटा देत एकखोड पद्धतीने डाळिंबाची लागवड करणाताना वक्ते यांनी अन्य शेतकऱ्यांच्या तुलनेत वेगळी वाट निवडली. राष्ट्रीयीकृत बँकेतील अधिकारी पदावरील नोकरी सोडून शेतीतच करिअर घडवणारे प्रगतशील शेतकरी वक्ते यांनी डाळिंबासाठी नाविन्यपूर्ण संकल्पना वापरल्या आहेत. घरच्या घरीच नैसर्गिक पद्धतीने खतांची निर्मिती करुन पिकांना देत त्यांची गुणवत्ता साधण्याची किमया त्यांनी केली आहे. आजमितीस वक्ते यांच्या शेतीत ३ एकरवर डाळिंबाची बाग डौलाने उभी आहे. डाळिंबाची शेती करण्याचा हा त्यांचा पहिलाच प्रयोग आहे. परंतु, आपल्या शेतात डाळिंबाची लागवड करताना त्यांनी वेगळा विचार अन् तंत्रज्ञानाचा वापर केला. प्रथमत: त्यांनी जिल्ह्यात आणि जिल्ह्याबाहेरील डाळिंबाच्या शेतीचा अभ्यास केला. त्यानंतर त्यांनी स्वत:चे गणित वापरले. एकखोड पद्धतीने डाळिंबाची लागवड केली. नाविन्यपूर्ण संकल्पना वापरुन फुलवली वेगळी फळबाग पिकांची वाढ, त्यांना खतांचे प्रमाण, डाळिंबाच्या रोपांची निवड, फळपिकाला पाण्याचे प्रमाण, त्यांची काळजी तसेच अतिरिक्तच्या सूर्यप्रकाशामुळे हानी टाळण्यासाठी फळांना बॅगिंग, वीड मॅटचा वापर, लोखंडी अँगल व बांबूला पर्याय म्हणून निलगिरीचे लाकडी खांब, लोखंडी तारेला पर्याय म्हणून पॉलिस्टर वायरचा वापर करुन खर्चात बचत यांसारख्या अनेक नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करत त्यांनी अन्य शेतकऱ्यांच्या डाळिंबांच्या तुलनेत स्वत:ची वेगळी डाळिंबाची बाग फुलवली आहे. — शेतकऱ्याचे नाव – योगेश वक्ते मोबाइल नंबर – 8412999111
प्रगतिशील शेतकरी:नोकरी सोडून घेतला शेतीचा ध्यास, नव तंत्रज्ञानाने बहरली फळबाग; एकखोड पद्धतीने 1570 झाडांची लागवड