Ajit Pawar Sharad Pawar NCP Reunion Signals | मागचे झाले गेले गंगेला मिळाले, एकोप्याने लढणार: साहेबांचे नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी; अजित पवारांच्या विधानाने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत – Pune News



पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, भविष्यात या दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होण्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. या पार्श्वभ

.

शरद पवारांचे नेतृत्व हे भविष्याचा वेध घेणारे असल्याचे सांगत अजित पवारांनी दिलेली ही साद दोन्ही गटांच्या पुनर्मिलनाची नांदी मानली जात असून, आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकसंध रूपात पाहायला मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

अजित पवार म्हणाले, आम्ही यावेळेस तुतारी आणि घड्याळाला बरोबर घेतले आहे. आम्हाला वाद घालायचा नाही. मागचे झाले गेले गंगेला मिळाले, आता आपण एकोप्याने काम करायचे आहे. साहेबांचे नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारे नेतृत्व आहे. केंद्राचे आणि राज्याचे राजकारण महापालिकेत आणायचे नाही. तिथले राजकारण तिथे ते इथे आणायचे नाही, असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील भ्रष्टाचाराचा आका कोण? असा सवाल करत त्या आकाला संपवायचे आहे, असा एल्गार अजित पवार यांनी केला. पिंपरी चिंचवड शहरातील भ्रष्टाचाराचा आका आपल्याला संपवायचा आहे. त्या आकाला आपल्याला त्याची जागा दाखवायची आहे असे अजित पवार म्हणाले. पिंपरी चिंचवड महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आयोजीत करण्यात आलेल्या सभेत अजित पवार बोलत होते. अजित पवार यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *