[ads1]
![]()
तुझे काम मार्गी लावतो म्हणत पोलिस उपनिरीक्षकाने महिलेवर अत्याचार केल्याची घटना वडवणी शहरात घडली.या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वडवणी तालुक्यातील २८ वर्षीय पीडीतेच्या सासरच्या मंडळींविरोधात छळाचा गुन्हा नोंद केलेला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने भेट घ्यायची आहे असे म्हणत वडवणी पोलिस ठाण्यात कार्यरत श्रेणी पोलिस उपनिरीक्षक गणेश राठोड हा शुक्रवारी रात्री महिलेच्या घरी गेला. तिथे त्याने तुझी केस मी मार्गी लावून देतो असे म्हणून महिलेशी जवळीक केली. महिलेने विरोध केल्यानंतर तिला धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. या प्रकारानंतर महिलेने डायल ११२ वर संपर्क केला. मात्र, सुरुवातीला तिची तक्रार घेण्यासाठी वडवणी पोलिसांनी सकारात्मकता दर्शवली नसल्याचा आरोप महिलेने केला. त्यानंतर महिला व तिच्या नातेवाईकांनी थेट पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांना फोन करुन आपबिती सांगितली. त्यानंतर वडवणी पोलिसांत श्रेणी पोलिस उपनिरीक्षक गणेश राठोडविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वडवणी पोलिस करत आहेत. ज्या पोलिस ठाण्यात पीएसआय म्हणून काम केले, त्याच ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची नामुष्की ओढवली. संशयित उपनिरीक्षकाच्या निवृत्तीला केवळ ३ वर्षे बाकी गणेश राठोड हा सिनिअर असून त्याच्या निवृत्तीला ३ वर्षे बाकी आहेत. एएसआय ते ग्रेड पीएसआय अशी त्याची पदोन्नती झालेली आहे. मुलीच्या वयाच्या महिला तक्रारदावर त्याने अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे.
[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad