Maharashtra Municipal Election BJP Internal Dissent Candidate Allocation Protests Medha Kulkarni Criticism | कुछ कह गए, कुछ सह गए. कुछ कहते कहते..: निष्ठवंतांच्या आक्रोशावर मेधा कुलकर्णींचा संताप; पोस्ट शेअर करत दिला घरचा आहेर – Pune News



छत्रपती संभाजीनगर, पुणे, अकोला आणि धुळे यांसह राज्यातील अनेक महापालिकांमध्ये उमेदवारी वाटपावरून भाजपमधील अंतर्गत असंतोष उफाळून आला आहे. अनेक वर्षांपासून पक्षासाठी राबणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून, बाहेरून आलेल्यांना संधी दिल्यामुळे जुन्या फ

.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आणि छाननी प्रक्रियेदरम्यान या संतापाचे पडसाद ठिकठिकाणी पाहायला मिळाले. विशेषतः छत्रपती संभाजीनगरमध्ये हा विरोध अधिक हिंसक झाला, जिथे एका कार्यकर्त्याने चक्क आत्मदहनाचा प्रयत्न केला. तसेच, संतापलेल्या कार्यकर्त्यांनी राज्याचे मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांच्या गाड्या अडवून त्यांना घेराव घातला. नेत्यांच्या गाड्यांना आणि फोटोंना काळे फासून कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केल्यामुळे भाजपमधील हा अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे.

भाजप खासदार आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनीही या वादात उडी घेतली आहे. कार्यकर्त्यांच्या या जाहीर नाराजीला पाठिंबा दर्शवत त्यांनी पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे भाजपमधील अंतर्गत संघर्ष आता अधिक तीव्र झाला आहे. मेधा कुलकर्णी यांनी एक पोस्ट केली आहे. त्या म्हणाल्या, “कुछ कह गए, कुछ सह गए. कुछ कहते कहते रह गए.”

महापालिका निवडणुकीमध्ये भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायावरून मेधा कुलकर्णी एक शेर पोस्ट करत पक्षालाच सुनावले आहे. त्यांनी पोस्ट करताना सुरूवातीलाच निष्ठावंत कार्यकर्ते असेही म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *