Mumbai Election BJP Rebellion Ticket Controversy Narvekar Family Internal Conflict | भाजपची नातेवाईकांना तिकीट न देण्याची घोषणा कागदावरच!: राहुल नार्वेकरांच्या कुटुंबात तिघांना उमेदवारी; भाजप उपाध्यक्षांकडून बंडखोरी – Mumbai News



मुंबई महानगरपालिका निवडणुकीत आमदार-खासदारांच्या नातेवाईकांना तिकीट नाकारण्याची घोषणा भाजपने केली असली, तरी प्रत्यक्षात मात्र पक्षाला मोठ्या प्रमाणावर अंतर्गत बंडखोरीचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यां

.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी बंडखोरी उफाळून आल्याने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. वॉर्ड क्रमांक 225 मध्ये भाजपच्या हर्षिता नार्वेकर यांच्यासमोर शिवसेनेच्या सुजाता सानप यांचे आव्हान असतानाच, आता भाजपचे मुंबई उपाध्यक्ष कमलाकर दळवी यांनीच बंडखोरी करत शड्डू ठोकल्याने नार्वेकर यांच्या मतांच्या विभाजनाची दाट शक्यता निर्माण झाली आहे. केवळ वॉर्ड 225 मध्येच नव्हे, तर प्रभाग क्रमांक 7 मध्येही शिवसेनेचे भूपेंद्र काशिनाथ कवळी यांनी बंडखोरी केल्याने तेथील भाजप उमेदवारासमोर पेच निर्माण झाला असून, मुंबईतील अशा वाढत्या बंडखोरीमुळे राजकीय गणिते बिघडण्याची चिन्हे दिसत आहेत.

गोरेगाव आणि चेंबूरमध्येही बंडखोरीचा फटका

गोरेगाव आणि चेंबूरमध्येही भाजपला मोठ्या बंडखोरीचा फटका बसला आहे. गोरेगावच्या प्रभाग क्रमांक 54 मध्ये उमेदवारी न मिळाल्याने संतापलेले भाजप महामंत्री संदीप जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. दुसरीकडे, चेंबूरमधील वॉर्ड क्रमांक 155 मध्ये अवघ्या दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या श्रीकांत शेटे यांना तिकीट देण्यात आल्याने ‘आयात’ उमेदवारांविरुद्ध निष्ठावंत कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. शेटे यांच्या उमेदवारीमुळे नाराज झालेल्या भाजपच्या तीन इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी केल्याने जुन्या कार्यकर्त्यांमधील असंतोष आता चव्हाट्यावर आला असून, यामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांच्या अडचणींत मोठी वाढ झाली आहे.

भाजपमधील बंडखोरीचे सत्र सुरूच असून आता घाटकोपर आणि चेंबूरमध्येही निष्ठावंतांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. चेंबूरमध्ये उमेदवारी न मिळाल्याने माजी नगरसेविका जयश्री खरात, हर्षा साळवे आणि शशिकला कांबळे यांनी अपक्ष अर्ज भरून पक्षाला आव्हान दिले आहे. तसेच, घाटकोपर वॉर्ड क्रमांक 29 मध्ये शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या माजी नगरसेविका अश्विनी मते यांना उमेदवारी दिल्याने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या निर्णयाचा निषेध म्हणून भाजपचे माजी नगरसेवक सूर्यकांत गवळी यांच्या भावजय सुरेखा गवळी आणि पदाधिकारी प्रकाश पाटील यांच्या पत्नी मालती पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आयात उमेदवारांना झुकते माप दिल्यामुळे निष्ठावंतांनी पुकारलेल्या या बंडामुळे भाजपच्या अधिकृत उमेदवारांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *