Pune Election Controversy Ajit Pawar Faces Criticism Criminal Candidates Political Credibility Questioned | अजित पवारांची दुटप्पी भूमिका?: गुन्हेगारी मुक्तीच्या वल्गना आणि जेलमधील आरोपींना ‘एबी’ फॉर्म; मुंबईतही शिंदेंपेक्षा जास्त उमेदवार – Pune News



गुन्हेगारांना टायरमध्ये घालू, अशा आक्रमक वल्गना करणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिका निवडणुकीत मात्र आपली सर्व तत्त्वे धाब्यावर बसवल्याचे चित्र दिसत आहे. पुण्याला गुन्हेगारीमुक्त करण्याचे स्वप्न दाखवणाऱ्या पालकमंत्र्यांनी राजकीय फ

.

पुण्यातील प्रभाग क्रमांक 23 मधून आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाने उमेदवारी दिली असून, या दोघी आता जेलमधूनच निवडणूक लढवणार आहेत. यासोबतच कुख्यात गजा मारणे याच्या पत्नीलाही उमेदवारी देऊन पवारांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या घराण्यांवर सढळ हाताने मेहेरनजर दाखवली आहे. एका बाजूला गुन्हेगारांविरुद्ध कठोर भाषेचा वापर करायचा आणि दुसऱ्या बाजूला त्यांनाच उमेदवारी देऊन राजकीय प्रतिष्ठा मिळवून द्यायची, अशा दुटप्पी भूमिकेमुळे ‘पालकमंत्री’ म्हणून अजित पवारांच्या विश्वासार्हतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा अधिक उमेदवार रिंगणात उतरवत महायुतीमध्ये स्वतःचे वजन वाढवले आहे. राष्ट्रवादीने मुंबईत एकूण 96 उमेदवार उभे केले असून शिंदे सेनेचे 90 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत. राष्ट्रवादीच्या या 96 उमेदवारांमध्ये 56 मराठी, 23 मुस्लिम, 11 उत्तर भारतीय, 3 ख्रिश्चन, आणि तेलगू, तमिळ व बोहरा मुस्लिम समाजाच्या प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश करून ‘सोशल इंजिनिअरिंग’ साधण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे, पक्षाने पुरुषांच्या तुलनेत महिलांना (50 महिला, 46 पुरुष) झुकते माप दिले असून, यात 12 अनुसूचित जाती आणि 17 ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना संधी देत सर्वसमावेशक चेहरा देण्याचा प्रयत्न केला आहे.

ठाकरे गटाने सर्वाधिक 163 जागांवर आपले उमेदवार उतरवले

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर स्पष्ट झाला असून, यामध्ये ठाकरे गटाने सर्वाधिक 163 जागांवर आपले उमेदवार रिंगणात उतरवत वर्चस्व राखले आहे. या नव्या युती समीकरणात मनसेला 53 जागा देण्यात आल्या आहेत, तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 11 जागा मिळाल्या आहेत. अशाप्रकारे मुंबईतील एकूण जागांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सर्वाधिक असल्याने, या निवडणुकीत ते मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *